Top Post Ad

ठाणे येथील खोपट एस.टी.स्टॅण्डवर वंचित बहुजन आघाडीचे डफली बजाओ आंदोलनराज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी  केली होती.  बाळासाहेब_आंबेडकर ह्यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी ठाणे ह्यांच्या वतीने ठाण्यातील खोपट S. T. स्थानक येथे डफली_बजाव_आंदोलन.  करण्यात आले. 


केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यानुसार आज ठाण्यातील वंचित बहुजन आघाडीचे राजाभाऊ चव्हाण आणि कार्यकर्ते यांनी सकाळी ठाण्यातील खोपट एस.टी.स्टॅण्डवर आंदोलन केले. यावेळी अनेक सर्वसामान्य नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले होते.   कार्यकर्त्यांनी जोरदार डफली नाद केला. मनाई आदेश झुगारुन हे आंदोलन करण्यात आले असल्याने सुमारे 40 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  


 
कोरोनाच्या महामारीमुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची मोठी हानी होत आहे. सर्वच व्यवहार बंद असल्याने गोरगरीबांना जगणे असह्य होत आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन हटविण्यात यावे; ठाणे शहरात टीएमटीच्या बसगाड्या सुरु कराव्यात; पश्चिम, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण आदी भागात जाण्यासाठी एसटी बससेवा सुरु करावी; ई-पास पद्धती बंद करावी; असंघटीत कामगारांना अर्थसाह्य देण्यात यावे,” अशा मागण्या  केल्या.
या आंदोलनात अकोला जिल्हा परिषद सदस्या सुश्मीता रमेश सरकटे,  जयंवत बैले, अमर आठवले, सुरेश कांबळे, राहुल घोडके, राजू कांबळे, जितेंद्र आडबले, किशोर खरात, बाबासाहेब येडेकर, उत्तम भालेराव, दशरथ वाव्हळ, किसन पाईकराव, मिलींद पाईकराव, गौतम कांबळे, रवी खिल्लारे, धम्मशील हरणे, राजू चौरे, संदीप शेळके, अमोल घोलप, बिशाखा हटकर, कविता खडसे, आशा खडसे, अविनाश कांबळे, अमोल पाईकराव, शाांताराम भिवसने, मारुती गायकवाड, साहेबा कोळे  आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.   


 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com