अनलॉक-4, शाळा सुरू करण्याचा विचार नाही
नवी दिल्ली,
केंद्र सरकारने अनलॉक-4 ची प्रक्रिया सुरु केली असून गृहमंत्रालय लवकरच नव्या गाईडलाईन्स जारी करणार आहेत. मेट्रो रेल सर्व्हिस, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार, सभागृह, असेंब्ली हॉल आणि अशाच गर्दीच्या ठिकाणी बंदी आहे. याव्यतिरिक्त, सामाजिक, राजकारण, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावरही बंदी आहे. मात्र अनलॉक-4 पर्यंत आणि दिवाळीनंतर देशातील बऱ्याच उपक्रमांमध्ये सूट दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार अनलॉक-4.0 मध्येही शाळा सुरू करण्याचा विचार करीत नाही. मात्र काही राज्ये उच्च शैक्षणिक संस्था उघडण्याच्या विचारात आहेत. अशा परिस्थितीत शाळा उघडणे जवळजवळ अशक्य आहे, परंतु आयआयआयटी-आयआयएमसह सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठे उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
चित्रपटाच्या शुटिंगसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आता सिनेमा हॉल सुरू करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना तयार करत आहे. काही दिवसात मार्गदर्शक तत्त्वे आल्यानंतर सिनेमा हॉल अटींसह उघडले जाऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार आरोग्य मंत्रालयाच्या अभिप्रायाने सिनेमा हॉल सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जात असून ती अंतिम टप्प्यात आहे. तर मालिका आणि चित्रपटांचे शुटिंग सुरू झाले आहे. लाइन निर्मात्यांनी मुंबईत शूटिंग सुरू केली आहे. आतापर्यंत दिल्ली-एनसीआरमध्ये जाहिरातींचे चित्रीकरण झाले आहे. मात्र, सरकारनं दिलेल्या अटी पाळून शुटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.
23 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने टीव्ही-चित्रपटांच्या शूटिंगसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यामुळे कर्मचार्यांना सुरक्षित वातावरण तयार होण्यास मदत होईल असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी एसओपीला ट्विट केले. मार्गदर्शक सूचनांमध्ये फेस मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य केले आहे. हे कलाकारांना लागू होणार नाही. बसण्याची व्यवस्था, कॅटरिंग, क्रू पोझिशन्स, कॅमेरा लोकेशनमध्ये अंतर राखले पाहिजे. रेकॉर्डिंग स्टुडिओ, संपादन कक्षांमध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणार आहे. सध्या प्रेक्षकांना सेटवर येण्याची परवानगी नाही.
दिवाळीपर्यंत हवाई वाहतूकही पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. नागरी उड्डयन मंत्री हरदीप पुरी यांनी आशा व्यक्त केली की दिवाळीपर्यंत कोव्हिड-19 सर्व देशभर पूर्वपदावर येईल. ते म्हणाले की, तोपर्यंत केंद्र सरकार मुंबई, कोलकाता यासारख्या ठिकाणांहून अधिक उड्डाणे देण्यास परवानगी देईल आणि त्यामुळे प्रवाशांची संख्याही वाढेल.
0 टिप्पण्या