शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने सीमा भागात तणावाचे वातावरण

शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने सीमा भागात तणावाचे वातावरणकोल्हापूर


कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुका मनगुती गावात 2 दिवसांपूर्वी अश्वारूढ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती, पण तेथील काही स्थानिक लोकांनी आणि तथाकथित प्रादेशिक अस्मिता मिरवणाऱ्या संघटनांनी या प्रतिष्ठापणेला तीव्र विरोध करत आणि कर्नाटक प्रशासनाने त्यांचीच बाजू घेत ही मूर्ती चौथऱ्यावरून हटवली.  बेळगाव जिल्हा प्रशासनानं अचानक  शुक्रवारी रातोरात हा पुतळा हटवला.   त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाब आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाब कमी झाला होता. मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या परवानगीनं शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्यात आला आहे. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे. शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवभक्त रविवारी (9 ऑगस्ट) कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलिस बंदोबस्तात पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. या विरोधात विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. सोमवारपर्यंत महाराजांचा पुतळा पुन्हा बसवला नाही तर मनगुत्तीमध्ये जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा सीमा भागातील मराठी बांधवांनी दिला आहे. गावकऱ्यांनी यासंदर्भात जाब विचारण्यासाठी ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता त्याठिकाणी गर्दी केली. दरम्यान कर्नाटक सरकारनं शिवाजी महाराजांचा हटवलेला पुतळा त्वरित उभा करावा, अन्यथा महाराष्ट्रातील शिवभक्त कर्नाटकात घुसतील, अशा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नूल गावातल्या गावकऱ्यांनी हा इशारा दिला आहे.


कर्नाटकात भाजपची सत्ता आहे म्हणून अश्या गोष्टींना महत्व मुद्दामहून दिले जात नाही, जर महाराष्ट्र मध्ये घडले असते तर या बाबत मोठ्याले लेख, पोस्ट, अर्णव सारखे भुंकून त्याच्या सीबीआय तपासाची मागणी करत अक्षरशः हलकल्लोळ झाला असता. या प्रकरणी सर्व शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन कर्नाटक प्रशासनाने मोजक्या समाजकंटक लोकांवर कायदेशीर कारवाही करावी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सन्मानपूर्वक करावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. 


कर्नाटक राज्यातील बेळगांव जिल्ह्यातील मनगुत्ती या गांवात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हलवण्याचं अत्यंत निषेधार्ह वर्तन कर्नाटकच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलं. ज्या ग्रामपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता आहे. तिथल्या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवला. त्याचा पूर्ण निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २०१४ साली देखील सांगत होता की छत्रपती शिवाजी महाराजांवरचं भाजपाचं प्रेम फक्त मतांपुरतं आहे. आज ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.. ही जी घटना घडली आहे त्याचा कडक निषेध सर्वत्र झालाच पाहिजे.असेही जयंत पाटील म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA