भातसा धरणाचे पाच दरवाजे ०.५, दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडल्याने
भातसा नदी किनारीच्या गावांना सतर्कतेचा इशारा
शहापूर
शनिवारी (दि.२९) सकाळी ७ वाजता भातसा धरणाची पाणी पातळी १४१.३० मीटर असून भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने भातसा धरणात येणारा संभाव्य येवा वाढत आहे. त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी जलाशय प्रचालन सुचिनुसार नियमित करण्यासाठी भातसा धरणाचे (१,३,५) दरवाजे ०.५ मीटरने व (२,४) क्रमांकाचे दरवाजे ०.२५ मीटरने शनिवारी (दि.२९) रोजी सकाळी ९.३० वाजता उघडण्यात येणार आहेत.
परिणाम स्वरूप भातसा धरणातून सुमारे २१२.८७५ क्यूमेक्स (घनमीटर प्रति सेकंद) विसर्ग प्रवाहित करण्यात आला असल्याने भातसा नदी तीरावरील गावाच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना उप कार्यकारी अभियंता भातसा धरण व्यवस्थापन विभाग भातसा नगर जलसंपदा विभागाकडून शहापूर तहसीलदार, ठाणे जिल्हाधिकारी ठाणे , ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक ठाणे, उपविभागीय अधिकारी भिवंडी, उपविभागीय अधिकारी ठाणे, उपविभागीय अधिकारी कल्याण, पोलीस निरीक्षक शहापूर पोलीस स्टेशन, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांना माहितीसाठी कळविले आहे.
भातसा नदीच्या तीरावरील विशेषतः शहापूर मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव व नदी काठावरील इतर गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांंनी गावााातीलल नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्या बाबत सतर्कतेच्या सूचना तसेच या काळात कोणत्याही प्रकारे वाढत्या पाण्यात प्रवेश न करण्याबाबत दक्षता घेण्याच्याही सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात अशी सूचना केली आहे.
0 टिप्पण्या