जो दुर्बलांच्या दु:खात धावून जातो तोच आपला विठ्ठल

जो दुर्बलांच्या दु:खात धावून जातो तोच आपला विठ्ठल


ठाणे


लॉकडाऊनच्या काळात वाघबीळ येथील जीवन संवर्धन फौंडेशन संचालित मालती गंधे मातृछाया गुरूकुल अनाथाश्रमातील मुलींच्या जेवणाच्या व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच श्रमजीवीच्या विवेक पंडीत यांनी कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कैलास खैरनार यांच्याशी संपर्क साधून त्यांना या अडचणीची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी मुलींची पूर्ण जबाबदारी घेतली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. खैरनार यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत मुलींच्या जेवणाची व्यवस्था केली आणि संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्याबद्दल आभार व्यक्त करताना त्यांना विठ्ठलाची मूर्ती भेट दिली. जो दुर्बलांच्या दु:खात धावून जातो तोच आपला विठ्ठल. आपण माझ्यासाठी विठ्ठलाचे रूप आहात असे भावूक उद्गार श्रमजीवी संघटनेच्या विवेक पंडीत यांनी यावेळी काढले.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या