ठाण्यात काँग्रेसचे ठिकठिकाणी खड्डे भरो आंदोलन 

ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे ठाण्यात ठिकठिकाणी खड्डे भरो आंदोलन 


ठाणे
शहरातील रस्ते आणि उड्डणपूलांवर खड्डे पडले असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे शहरातील 12 ब्लॉक्स मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहर अध्यक्ष, पालिकेतील गटनेते नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी खड्डे भरो आंदोलन केले.  कळवा, मुंब्रा, कौसा, दिवा, कोपरी, वागळे, इंदिरा नगर, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत माजिवडा, मानपाडा, ओवळा कासारवडवली, पाचपाखाडी, नौपाडा, मीनाताई ठाकरे चौक, लोकमान्य नगर, तिन हात नाका येथे हे आंदोलन करण्यात आले.  आंदोलनात ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, युवक, एनएसयुआयचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या,सर्व ब्लॉक अध्यक्ष, सर्व सेलचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या