Top Post Ad

शाळा-महाविद्यालये व कोचिंग क्लासेस, मनोरंजन पार्क आणि थिएटर ३० सप्टेंबरपर्यंत बंदच

शाळा-महाविद्यालये व कोचिंग क्लासेस, मनोरंजन पार्क आणि थिएटर  ३० सप्टेंबरपर्यंत बंदच 


नवी दिल्लीशाळा-महाविद्यालये व कोचिंग क्लासेस ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहतील. मात्र ९वी ते १२वीपर्यंतचे विद्यार्थी पालकांची लेखी परवानगी घेऊन शाळेत शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाऊ शकतील. हा पर्याय ऐच्छिक असणार आहे. स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्क आणि थिएटरही ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहतील. ओपन एअर थिएटर मात्र सुरू होऊ शकतील. ऑनलाइन/ दूरस्थ शिक्षण पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवता येईल.  असे अनलॉक-४ चे नवीन दिशानिर्देश केंद्र सरकारने शनिवारी सायंकाळी जारी केले. यामध्ये   रेल्वे पुन्हा सुरू करण्याबाबत काहीही तपशील देण्यात आलेला नाही. राज्य सरकारे कंटेन्मेंट झोनच्या बाहेर केंद्राच्या परवानगीशिवाय लॉकडाऊन लागू करू शकणार नाहीत. नीट-जेईईला विरोध करणारी राज्ये लॉकडाऊन लावतील अशी केंद्राला शंका होती.


नव्या दिशानिर्देशानुसार, बहुतांश कामकाज वेगवेगळ्या तारखांना सुरू होईल, तर काही कामकाज निम्मा महिना उलटून गेल्यानंतर म्हणजे २१ सप्टेंबरपासून सुरू होईल. कंटेनमेंंट झोनमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत कठोर लॉकडाऊन सुरूच राहील. दिशानिर्देशांत सर्वात मोठा निर्णय सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांसंदर्भात घेण्यात आला आहे. २१ सप्टेंबरपासून १०० लोकांच्या उपस्थितीसह कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. लग्न व अंत्यविधीस १००-१०० लोक हजर राहू शकतील. २१ सप्टेंबरपासून शाळांकडून ऑनलाइन शिक्षणासाठी ५० टक्के शिक्षक व ५० टक्के शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावू शकतात. ९ वी ते १२ वीपर्यंतचे विद्यार्थी पालकांच्या लेखी परवानगीने शिक्षकांना भेटण्यासाठी शाळेत जाऊ शकतील.


शाळा, कॉलेज, कोचिंग इन्स्टिट्यूअ ३० सप्टेंबरपर्यंत बंदच. कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील शाळा ५०% टिचिंग-नॉनटिचिंग कर्मचाऱ्यांना बोलावू शकतील. यासाठी नंतर वेगळा एसओपी. नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि आयआयटीमध्ये प्रशिक्षण सुरू होऊ शकेल. पीएचडी, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी प्रयोगशाळेच्या संबंधित कामांसाठी महाविद्यालयात किंवा विद्यापीठात जाऊ शकतील. यासाठी परवानगीची गरज भासणार नाही.  सांस्कृतिक, क्रीडा, मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम आयोजन स्थळावर मास्क, डिस्टन्सिंग, थर्मल स्कॅनिंग, हात धुण्याची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था अनिवार्य असेल.  विवाह किंवा अंत्यसंस्कार यात २१ सप्टेंबरनंतर १०० लोक सहभागी होऊ शकतील. २० सप्टेंबरपर्यंत पूर्वीप्रमाणेच ५० व २० लोकांना परवानगी असेल.   मेट्रो रेल्वे सुरू होईल. प्रवासी रेल्वे, देशांतर्गत प्रवासी विमाने, वंदे भारत मिशन अंतर्गत चालणारी उड्डाणे पूर्वीप्रमाणे राहतील. तसेच  एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी परवानगी किंवा ई-पासची आवश्यकता राहणार नाही. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com