सिडको आणि जेएनपीटी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उरणमध्ये कोरोनाच्या संख्येत वाढ

करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभुमीवर उरणमधील JNPT एरिया  तात्काळ लॉकडाऊन घोषित करा
कामगार नेते महेंद्र घरत यांची रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे मागणी.
सिडको, JNPT प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचा  महेंद्र घरत यांचा आरोप.उरण


उरण तालुक्यात करोना रुग्णची संख्या वाढत असताना सिडको प्रशासन, JNPT प्रशासन व स्थानिक पंचायत समिति व तहसील प्रशासन कडून ठोस उपाययोजना होताना दिसून येत नाही. परिणामी उरणच्या करोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. यावर वेळीच ठोस व प्रभावी कायमस्वरूपी उपाययोजना केले गेले नाही तर समस्त उरण तालुक्यातील जनतेचे आरोग्य धोक्यात आहे त्यामुळे सिडको, JNPT प्रशासन व अन्य शासकीय यंत्रणेने बघ्याची भूमिका न बघता त्वरित उपाययोजना कराव्यात. तसेच संपूर्ण JNPT एरिया, पोर्ट, टाऊनशीप हे सर्व एरिया लॉकडाउन करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय इंटक काँग्रेसचे सचिव,  कामगार नेते महेंद्र घरत यांनी रायगडचे जिल्हाधिकारी निधि चौधरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


JNPT आणि सिडको आपले CSR फंड इतर जिल्ह्यात फिरवतात पण ज्या ठिकाणी ते व्यवसाय आपला धंदा करतात त्या ठिकाणी एकही रुपया खर्च करत नाहीत या ठिकाणी मिळणाऱ्या COVID 19 कोरोना  पेशंट चा सर्व खर्च प्रामुख्याने JNPT आणि सिडको यांनी करावा नव्हे तर ते त्यांचे उत्तरदायीत्वच आहे.मात्र JNPT प्रशासन हे करताना दिसत नाही.आणि आज या ठिकाणी covid 19 कोरोनाची जी  परस्थिती उद्भवलेली आहे त्याला सर्वस्वी JNPT व त्यातील तीन आंतरराष्ट्रीय बंदरे आणि सिडकोचे प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहेत यांच्यावर  कडक कारवाई करण्यात यावी आणि या ठिकाणी ताबडतोब 10 दिवसांचा कामगारांना भर पगारी  लॉकडाऊन घोषित करावा असे घरत यांनी पत्रात म्हटले आहे.


आज उरण तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात covid 19 कोरोना विषाणू चा फैलाव जोरात सुरु झाला आहे.याला विशेष कारणीभूत आहेत JNPT मधील  4 आंतरराष्ट्रीय बंदरे. उरण तालुक्या मध्ये असलेली जी चार आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत ती आज JNPT च्या अखत्यारीत आहेत या JNPT अंतर्गत  असलेले GTI बंदरात 29  कोरोनो पॉसिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. त्याच बरोबर न्हावा शेवा पोलीस स्टेशनं मध्ये 11 पोलीस बांधवाना कोरोना ची लागण झालेली आहे. असेच रुग्ण उरण तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा मोठया प्रमाणात सापडायला सुरवात झाली आहे. आणि या सर्व घडामोडींना JNPT प्रशासन जबाबदार आहे या बंदरांमध्ये मोठया प्रमाणात अमेरिका, इंग्लंड,चीन, जपान,  युरोप, ब्राझील, रशिया, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, आफ्रिका, इराक, इराण, पाकिस्तान,  श्रीलंका, बांगलादेश या ठिकानाहून मोठया संख्येने जहाजे ये जा करत असतात या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना कोणत्याही प्रकारची सोई सुविधा या बंदरानी परिणामी  JNPT नी दिल्या नाहीत. त्याच बरोबर उरण तालुक्यात अनेक ठिकाणी या बंदराचे मोठमोठे CFS आहेत हजारो लोक तिथे आपला जीव धोक्यात घालुन काम करत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारच्या सोई सुविधा किंवा त्यांचा साधा  covid 19 (कोरोना )विमा सुद्धा काढला गेला नाही. 
   


येथील सर्व परिस्थितीला सिडको आणि JNPT जबाबदार आहे. JNPT चा करोडो रुपयांचा CSR  फंड पडुन आहे. JNPT हा फंड इतर जिल्ह्याना देते पण येथील स्थानिकांना मात्र कधीच देताना दिसत नाही . वास्तविक पाहता याठिकाणी JNPT ने Covid 19 च्या साठी स्वतंत्र अत्याधुनिक सुसज्ज हॉस्पिटल उभारणे गरजेचे होते परंतु या गोष्टींकडे  JNPT  प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. कामगारांना कोणत्याही सुविधा देत नाही. या गोष्टीचा कोणीही प्रामुख्याने गांभीर्याने विचार करत असताना दिसत नाही.त्या अनुषंगाने रायगड जिल्हयाचे जिल्हाधिकारी निधि चौधरी यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून JNPT विरोधात कडक पाऊल उचलून कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतुन सर्वत्र होत आहे तरि जनतेच्या मताकडे JNPT प्रशासन व येथील शासकीय यंत्रणा जाणून बुजुन दुर्लक्ष करत आहे  असा आरोपही घरत यांनी केला आहे.
       
सिडकोने या भागातील जमिनी नाममात्र किमतीत औद्योगिक विकासाच्या नवाखाली  घेऊन येथील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या जमिनी घेत असतांना सिडकोने येथील शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते कि तुम्हाला आम्ही सर्व नागरी सुविधा देऊ त्या आजपर्यंत जवळ जवळ 30 ते 35 वर्षे झाली तरी मिळालेल्या नाहीत. या मध्ये वीज, रस्ते, गटारे, पाणी, शाळा,  मैदाने, समाज मंदिर,  सुसज्ज हॉस्पिटल परंतु यातील एकही आश्वासन सिडको ने पूर्ण केल नाही. कोट्यावधी पैसे सिडको कडे पडुन आहेत या ठिकाणी या पैसाचा वापर इतरत्र होतो परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपल्या  पीकत्या जमिनी विकासाला दिल्या त्या शेतकऱ्यांना सिडकोने वाऱ्यावर सोडले आहे.Covid 19(कोरोना ) हॉस्पिटलसाठी  सिडकोने मुलूंड ला पैसे दिले परंतु उरण मधील भूमीपुत्रांसाठी एक रुपया खर्च केला नाही या गोष्टीचा महेंद्र घरत यांनी निषेध केला आहे.


 
 


   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA