लॉकडाऊनच्या काळात अण्णा तरे यांनी दिला गरजुंना मदतीचा हात 

लॉकडाऊनच्या काळात अण्णा तरे यांनी दिला गरजुंना मदतीचा हात 


टिटवाळा


टिटवाळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव मोरेश्वर (आण्णा) तरे यांच्याकडुन लाँकडाऊनच्या कालावधीत आत्ता पर्यंत त्यांचा कार्यालय तसेच वॉर्डात आणि आजुबाजुच्या  परसरीसरात प्रत्यक्ष जाऊन गरजूंना धान्य वाटप करण्यात आले. टिटवाळ्यातील समाजसेवेचा वसा घेतलेले आण्णां तरे यांची काम करण्याची शैली, जनमानसातील एकूण प्रतिमा सवँ बाबी आण्णां चोखपणे पार पाडत आहेत. गावातील समस्या सोडविणे, अन्य सभोवतील परिसरामध्ये छोट्या मोठ्या अडचणी दूर करणे त्याचसोबत कचर्याचा प्रश्न वीजेची समस्या,बिल्डरांकडून सोसायटी धारकांना होणारा त्रास, भांडण तंटे, अश्या अनेक अडचणी आण्णां प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या सोडवतात. आण्णां एका फोनवर तक्रारींचे निवारण झटपट करतात. आण्णांची एक चांगली छबी खूप भावते ती म्हणजे, आण्णां कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आमने-सामने रेकॉर्डिंग करून नागरिकांना पाठवतात त्यामुळे गावकर्‍यांना हि त्याचे समाधान वाटते। 
कोरोनाच्या भयानक स्थिती मध्ये  आण्णांनी स्वतःला झोकून देत टिटवाळ्यातील बहुतेक विभागांमध्ये मग ते बौध्दवाडी, गणेश वाडी, नारायण नगर, महागणपती मंदिर परिसर तसेच विठ्ठल मंदिरात स्वतः च्या हस्ते धान्याचे वाटप केले, टिटवाळावासियांची काळजी घेतली. आण्णां नेहमी टिटवाळाकरांसाठी भक्कमपणे उभे असतात योग्य वेळी मदतीला हात देतात अशी प्रतिक्रिया टिटवाळ्यातील नागरिक व्यक्त करतात.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA