धारावी नियंत्रणात, आता इतर भागातील प्रादुर्भावावर लक्ष

धारावी नियंत्रणात, आता इतर भागातील प्रादुर्भावावर लक्ष


मुंबई


महापालिकेच्या अथक परिश्रमाने धारावीकरांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी केला. त्यामुळे आता झोपडपट्टीत कोरोना नियंत्रणात आला असल्याचे चित्र आहे. परंतु हायप्रोफाईल परिसरात कोरोना परसत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वांद्रे, सांताक्रुझ पूर्व, एच पूर्व प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५३ दिवसांचा आहे. शहर, उपनगरात कुलाबा ए विभाग आणि वांद्रे, कुझ पश्चिम, एच पश्चिम विभागांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.या दोन विभागांतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी घटला असून वाढीचा दर वाढला आहे. मुंबईत कोरोनामुळे झालेल्या मृतांपैकी अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू २९१ आहेत.   मुंबईच्या तुलनेत सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत ठाणे, पुणे जिल्हा आघाडीवर आहे. ठाणे जिल्ह्यात ३७,२९५, तर पुण्यात ३१,३८० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मुंबईत ४ लाख २७ हजार ३७८ चाचण्या झाल्या असून शहरउपनगरात १५,९९० लक्षणविरहित रुग्ण आहेत तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २३,९१७ आहे.   राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात आढळला होता. त्यानंतर कोरोनावर उपाययोजना करीत राज्य शासन व पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र तरीही चार महिन्यांनंतरही कोरोनावर मात करण्याची लढाई सुरू आहे. राज्यात शनिवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने तीन लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे, तर मुंबईतही एक लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad