वंचित बहुजन आघाडीतर्फे रुग्णालयास स्ट्रेचर, मेडिकल ट्रॉली तसेच ४ हजार मास्क चे वाटप
मुंबई
चेंबूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतीगृहात येणाऱ्या रुग्णांना अनेकदा वॉर्डापर्यंत हलविण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांची ऐनवेळी तारांबळ उडते. ही गरज लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीतर्फे रुग्णालयास स्ट्रेचर भेट देण्यात आले. तसेच चेंबूर येथील मॉं रुग्णालयासही मेडिसिन ट्रॉली भेट देण्यात आली. मुंबईमध्ये कोरोना ने सध्या थैमान घातले असतांना रुग्णालयांना वैद्यकीय सामग्री तसेच गरिबांना ४००० मास्कचे वाटप करून व.ब.आघाडी व संतोष रोकडे यांच्या पुढाकाराने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. या वैद्यकीय सामग्री वितरणाच्या वेळी स्वप्नील जवळगेकर, रोहित जगताप, अनिल म्हस्के, आकाश गवळी, संदेश वाघमारे, किरण निकम,स्वप्नील गरुड,ऋषभ ढोणे,वैभव पांडव,महेश साळुंके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे रुग्णालयास दिलेले स्ट्रेचर आणि मेडिकल ट्रॉली तडक रुग्णसेवेत रुजूदेखील करून घेण्यात आले.
0 टिप्पण्या