इंटकच्या मागणीने ठाणे आगार सील
ठाणे
महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग ठाणे आगार क्र.1 येथील कर्मचारी-यांची कोरोना पॉझिटिव्ह होण्याची संख्येमध्ये दिवसेदिवस वाढ होत होती. यामुळे सर्व कर्मचारी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.यावर आगार सिल करण्याची मागणी कर्मचारी वर्गाकडून होत होती.कर्मचारी यांची मागणी रास्त असताना देखील आगार सिल करणेसाठी एस.टी.प्रशासनाकडून कोणतेही ठोस पावले उचलली जात नव्हती.अशावेळी हि बाब ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्वरित मा.जिल्हाधिकारी ठाणे यांचेशी दुरध्वनी वरुन संपर्क साधुन आगार सिल करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आगार सिल करण्याची मागणी मान्य केली. ६ जुलै रोजी एस.टी प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ७ आणि ८ तारखेस आगार बंद करण्याचा निर्णय घेतला व या कालावधीत संपूर्ण आगार निर्जतूकीरण करण्याच्या सूचना परिवहन प्रशासनाने दिल्या आहेत. अशी माहिती महाराष्ट्र एस.टी वर्कर्स काँग्रेस इंटक ठाणे विभाग, सहसचिव मनेश सोनकांबळे यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या