धोकादायक इमारतीतील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करा

ठाणे शहर (जिल्हा ) काँग्रेस कमिटीने घेतली ठाणे महापालिका आयुक्तांची भेट

 

ठाणे

 

आता पावसाळा सुरू होत आहे ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक धोकादायक इमारती असून आजही या इमारतीमध्ये नागरिक भीतीच्या छायेत राहत आहेत. तात्काळ अशा नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासंदर्भात ठाणे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांशी आज (७ जुलै)  चर्चा केली. आजच्या घडीला पालिकेच्या आर्थिक परिस्थिती कशी यावर देखील सविस्तर चर्चा करून पालिकेच्या तिजोरी रिकामी असेल तर तात्काळ पालिकेने  एम.एम.आर.डी. ए. कडून कर्ज उचलावे अशी सूचनाही शिष्टमंडळाने पालिकेला केली आहे. ठाणे शहर (जिल्हा ) काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका आयुक्त  डॉ. बिपीन कुमार शर्मा यांची भेट घेतली. भेटी दरम्यान शहरातील कोरोनाची स्थिती जाणून घेत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या. यावेळी माजी गटनेते संजय घाडीगावकर, प्रदीप राव, सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील,  इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे, युथ काँग्रेस अध्यक्ष जिया शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या भेटी दरम्यान ठाणे शहरातील कोरोनाचा अटकाव करण्यासाठी पालिका प्रशासन लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने करत असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी होत असली तरी परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी कृति आराखाडा राबवून नियमबाह्य कृती विरोधात कार्यवाही करायला हवी असे मत शिष्टमंडळाने व्यक्त केले. याकाळात कोव्हिड रुग्णालयाचे धोरण निश्चित करणे, आपत्कालीन सुविधेसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांचे अधिकारी व  जबाबदाऱ्या निश्चित करणे, आपत्कालीन सुविधा उभारण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थांची निवड करणे, आरोग्य सेवकांची पुरेशी टीम तयार करणे, औषध आणि वैद्यकीय उपकरणांची कमतरता कमी भासू न देणे, आदी उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करून ठाणे शहरातील परिस्थिती सुधारणा करता येईल असे शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले. मागील चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याचीही दक्षता पालिका प्रशासनाने घेतली पाहिजे, असे शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांना सांगितले.

 


 

  

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA