१५ हजारपेक्षा कमी पगारावर काम करतात त्यांचा पीएफ सरकारने भरला
नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची मुदत वाढविण्यात आली आहे. 1 जुलैपासून ते 3 महिन्यांसाठी वाढविण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधीही वाढविण्यात आला आहे. आता नोव्हेंबरपर्यंत लोकांना धान्य मिळेल. तसेच ज्या कंपनीत 90% लोक15 हजारपेक्षा कमी पगारावर काम करतात. त्यांचा पीएफ सरकारने भरला. अशा 3 लाख 67 हजार उद्योगांना आणि 72 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा झाला आहे. असे त्यांनी सांगितले.
उज्ज्वला योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या तीन सिलिंडरची मुदत जून ते सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासाठी 13500 कोटी रुपये खर्च येणार आहे. 4 कोटी लोकांना याचा फायदा होईल. मंत्रिमंडळाने जून ते ऑगस्ट या कालावधीत आणखी तीन महिन्यांसाठी ईपीएफ शेअरिंग 24% (कर्मचारी 12% आणि संस्थानाचे 12%) वाढविण्यास मान्यता दिली. यामध्ये एकूण अंदाजे खर्च 4 हजार 860 कोटी रुपये होईल. याचा फायदा 72 लाखाहून अधिक कर्मचार्यांना होईल.ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या तीन सार्वजनिक क्षेत्रातील जनरल विमा कंपन्यांसाठी 12450 कोटी रुपयांच्या कॅपिटल गुंतवणूकीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यामध्ये 2019-20 या आर्थिक वर्षात केलेल्या 2500 कोटींच्या गुंतवणूकीचा समावेश आहे. बैठकीत ओरिएंटर, नॅशनल आणि यूनायटेड इंडिया इंश्योरेन्स कंपनीमध्ये 12450 कोटी रुपयांचे कॅपिटल गुंतवणूकीला मंजूरी देण्यात आली. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत ईपीएफच्या वाट्याला 24% वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली, 72 लाख लोकांना याचा फायदा होईल. असे मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठऱले.
0 टिप्पण्या