जोशी बेडेकर महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना फी भरण्याकरिता नोटीस

ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालय व्यवस्थापनाची विद्यार्थ्यांना फी भरणेबाबत नोटीस

 

ठाणे

 

मार्च पासून देशात व राज्यात कोरोना संकट असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पालक कामाविना घरी आहेत, रोजगार बुडाल्याने लोकांना दैनंदिन जीवनावश्यक गरजा ही भागवताना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. अशी बिकट परिस्थिती असताना व कॉलेजमध्ये शिक्षणाची सुरुवातही झाली नसताना फी भरण्याची ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे. फी भरण्याची विद्यार्थ्यांवर सक्ती करणे हा मोठा अन्याय असल्याचे मत ठाणे युवक काँग्रेसचे प्रविण जगदीश खैरालियां यांनी व्यक्त केले आहे.

 

याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा (गोडसे) गायकवाड यांना पत्र पाठवले आहे.  घरात जेवायची अडचण असताना पालकानी मुलांची शिक्षण फी कुठून भरावी ? हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महाविद्यालयाने दिलेल्या नोटीसीमध्ये फी भरण्याची तारीख पर्यंत फी न भरल्यास विद्यार्थ्यांचे ऍडमिशन रद्द होणार असलयाचे सांगितले आहे. महाविद्यालय प्रशासनाची ही भूमिका विद्यार्थी व कुटुंबियांना ताण वाढविणारी आहे. आर्थिक कोंडी मुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत असून महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्याना आधार देण्याची गरज आहे. तरी आपण सदर महाविद्यालयाला फी भरणाची तारीख आणि अटी मध्ये शिथिलता आणण्याचे व फी सुलभ हफ्त्यात मध्ये भरण्याची मुभा देणे बाबत योग्य ते निर्देश द्यावे अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे शिक्षणंत्र्यांना केली आहे. 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad