अधिकारी आणि नगरसेवक यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता

प्रभागनिहाय दक्षता समिती गठित करण्याबाबत


ठाणे महापालिकेचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक यांचा वेबसंवादठाणे


आपली लढाई ही एकमेकांच्या विरोधात नसून कोरोनाविरूद्धची असून ही लढाई आपणा सर्वांना एकत्रितपणे लढायची आहे. त्यासाठी प्रशासन आणि नगरसेवक यांनी एकत्रितपणे समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे मत  महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी नगरसेवकांच्या वेबसंवादामध्ये व्यक्त केले. कोवीड१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभागनिहाय दक्षता समिती गठित करण्याबाबत महापालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांचा वेबसंवाद आयोजित करण्यात आला होता. या वेबसंवादामध्ये बोलताना महापौर  म्हस्के यांनी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेवून काम करण्याचा महापालिका आयुक्तांच्या निर्णयाबद्दल त्यांचे सर्वांच्यावतीने आभार व्यक्त केले.


अधिकारी आणि नगरसेवक यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. सर्वजण शहरासाठी अहोरात्रपणे काम करीत आहेत. यापुढे लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रितपणे काम करू.या वेबसंवादाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी आपली लढाई एकमेंकाविरूद्ध नाही तर आपल्या सर्वांना कोरोनाविरूद्ध लढायचे आहे. त्यामुळे सर्वांनी समन्वयाने काम करू अशी ग्वाही दिली.


ठाणे शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औषधे, रूग्णालय व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत असून आपल्याला पारदर्शी पद्धतीने काम करायचे आहे. इंजेक्शन खरेदीसाठी निविदा काढली असून एका आठवड्यात इंजेक्शन्स येणार आहेत. या महामारीमध्ये एक व्यक्ती कोणाही काही करणार नाही. सर्व नगरसेवक अहोरात्र पुर्ण क्षमतेने काम करीत आहेत. त्यामुळे प्रभागनिहाय कोवीड १९ दक्षता कमिटीच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांवर काम करता येईल असेही महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad