भले तर आमची सॅलरी कमी करा पण कंपनी विकू नका

ज्या २३ कंपन्यांना भारत सरकारने विकायला काढल्या आहेत  त्यात पवनहंस ही पण एक कंपनी आहे. पवनहंसच्या कर्मचाऱ्यांनी ही कंपनी विकायला विरोध केला आहे. भले तर आमची सॅलरी कमी करा अशी आर्त मागणी सरकारकडे केली तरीही सरकारने त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.

पवनहंस ही कंपनी हेलिकॉप्टर सर्विस देणारी कम्पनी आहे,याच्या अगोदर भारताजवळ अशी कुठलीच कंपनी नव्हती की जे हेलिकॉप्टर चा उपयोग करत होती.  पवनहंस या कंपनीची निर्मिती १५ ऑक्टोबर १९८५ राजीव गांधींच्या पुढाकाराने केली गेली. याची पहली व्यावसायिक उड़ान ओएनजीसी साठी  ६ ऑक्टोबर १९८६ ला झाली.... एक वर्षाच्या आतच पवनहंस ने ओएनजीसी मध्ये आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर....सर्व विदेशी कंपन्यांना मात देऊन....अव्वल स्थान पटकावले....याचा फायदा असा झाला की....की आपली विदेशी मुद्रा बाहेर न जाता देशातच राहिली व यातून राष्ट्रीय हित साधले गेले.... पवनहंस दिवसंदिवस समोरच जात होती... पूर्ण एशिया मध्ये पवनहंस च्या टक्कर ची कुठलीही कंपनी नाही....कारण यांच्याजवळ 7 लाख तास हेलिकॉप्टर उडवण्याचा अनुभव आहे...

पवनहंस चे 51 टक्के शेयर हे भारत सरकारचे व 49 टक्के शेयर ओएनजीसी चे आहेत.  पवनहंसच्या निर्मिती नंतर ही कंपनी कधीच तोट्यात गेली नाही. या कंपनीने  2013-14 पर्यंत भारत सरकारला  223.69 करोड़ चा नफा कमावून दिला. मात्र  २०१४ मध्ये सरकार बदलल्यावर ही कंपनी तोट्यात  कशी काय गेली. २०१८-१९ मध्ये कंपनीला ८९ करोडचा तोटा कसा काय झाला?  जी कंपनी कधी तोट्यातच गेली नाही ती अचानक २०१४ नंतर तोट्यात कशी काय असा ? असा सवाल कामगार वर्गाने केला आहे. .कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला सरकारकडे पैसा नाही. कंपनी कर्जात बुडाली. आता ही कंपनी कवडीमोल किंमतीत भांडवलदारांच्या खिशात घालून ते भांडवलदारच सरकारकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करणार अशी संतप्त प्रतिक्रिया कामागारांनी दिली.

 

http://www.mediavigil.com/news/ground-report/ongc-directors-have-decided-to-sell-49-stake-in-pawanhans/

   51% शेअर भारत सरकारचे जरी असले तरी 49% शेअर ओनजीसीचे आहेत. त्यामुळे पवनहंसला विकायला अडचण येत होती. म्हणून ओनजीसीचे डायरेक्टरपदी संबित पात्रा यांची वर्णि लावण्यात आली. ज्यामुळे ही कंपनी तोट्यात चालत आहे यावर शिक्कामोर्तब झाले. परिणामी आता तिला विकायला काहीही अडचण नाही. जी पवनहंस कंपनी २०१३-१४ पर्यंत भारत सरकाला फायदा कमावून देत होती व अतिमूल्यवान विदेशी मुद्रेची बचत करत होती. ती केवळ मागील ६ वर्षात तोट्यात कशी काय गेली. असा सवालही कामगारांनी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA