पुन्हा एकदा अस्पृष्यतेचे वारे... पुरोगामी व सनातनी एकच
पुन्हा एकदा अस्पृष्यतेचे वारे... पुरोगामी व सनातनी एकचप्रसंग १ : स्थळ - गावाची वेस , वेळ सकाळी कधीतरी.


दाढी टोपी वाले दोन मुस्लिम तरुण मोटारसायकलवरून एका खेडे गावात जात असताना रस्त्यावर उभे असलेले टोळके त्यांना अडवते. त्यातील युवा नेता त्या दोघांना उद्देशून म्हणतो...आज पासून तुम्हाला आमच्या गावात येता येणार नाही... तुमच्यामुळे आमच्या धर्मातील लोकांना कोरोनाची लागण होईल...प्रसंग २ : स्थळ - बागवानाचे फ्रूट स्टॉल , वेळ दुपारी कधीतरी.


बागवान : सफरचंद ताजे आहेत साहेब...८० रुपये किलोने घेतले आहेत...सकाळपासून एकही गिर्हाईक झाले नाही...तुम्ही तरी घ्या...५० रुपये किलोने देतो...
गिर्हाईक : नको...तुमच्याकडून इथून पुढे काहीच घ्यायचे नाही...कोरोना होईल...
बागवान : अस नका करू हो साहेब...तुम्ही नेहमी माझ्याकडून खरेदी करता...पोर बाळ उपाशी मरतील हो साहेब...
त्याच्याकडे दुर्लक्ष करून साहेब हिंदूंच्या दुसऱ्या स्टॉलकडे वळतात.


---------------------------------------------------------------------


ब्राह्मण पुष्यमित्र शुंगाने सम्राट बृहदरथ मौर्याच्या केलेल्या हत्येनंतर भारतात जाती व्यवस्था निर्माण झाली. या जातिव्यवस्थेचा परिणाम म्हणजे ब्राह्मणांनी काही बौद्ध लोकांना अस्पृश्य घोषित केले तर काही लोकांना प्रासंगिक अस्पृश्य घोषित केले गेले. महार, मांग, चर्मकार इत्यादी जातीतील लोक ब्राह्मणांच्या दृष्टीने कायम अस्पृश्य आहेत तर आजचे शुद्र/ओबीसी लोक हे प्रासंगिक अस्पृश्य आहेत. ऐतखाऊ ब्राह्मणांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या शुद्र / ओबीसी लोकांच्या कडूनच होत असल्याने त्यांच्या बरोबर कायम अस्पृश्यता पाळण्याऐवजी त्यांच्या बरोबर प्रासंगिक अस्पृश्यता पाळणे यात ब्राह्मणांचा एक स्वार्थ होता.
शंकराचार्यापर्यंत शुद्र व अस्पृश्य अशी स्पष्टता नव्हती पण नंबुद्रीपाद ब्राह्मण शंकराचार्याने मानवी इतिहासात अत्यंत नीच पातळीवर जाऊन शुद्र व अस्पृश्य असे दोन वर्ग निर्माण केले. यामध्ये शूद्रातील जातींना ते अस्पृश्यच मानत होते पण कायमस्वरूपी अस्पृश्य मानले असते तर त्यांचे जगणे मुश्कील झाले असते.
शुद्र जाती मधील लोकांच्या बरोबर प्रासंगिक स्पृश्यता पाळल्याने त्यांचे खालील प्रमाणे लाभ झाले...
अन्न धान्य - कुणबी /मराठा., भाजीपाला - माळी., कपडे - शिंपी., भांडी -कुंभार., घरातील वस्तू - सुतार., टक्कल, शेंडी - नाभिक ; इत्यादी.... ब्राह्मणांनी प्रासंगिक अस्पृश्यता सर्वच शुद्र/ ओबीसी लोकांच्या बरोबर पाळली आहे.


छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे.


साताऱ्याच्या राजवाड्यात ज्यावेळी शाहू महाराज एका घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते त्यावेळी या अस्पृश्यतेचा अनुभव त्यांनी घेतला आहे. शाहू महाराजांचा अन्नाला विटाळ होईल म्हणून ब्राह्मण खानसाम्याने मुदपाक खाण्यातून शाहू महाराजांना हाकलून दिले होते. ब्राह्मणाने केलेला हा अस्पृश्यतेचा व्यवहार शाहू महाराजांच्या जिव्हारी लागला होता. आजही सोवळ्यातील ब्राह्मण शुद्र/ओबीसींच्या बरोबर अस्पृश्यतेचा व्यवहार करत असतो.


पुण्यात तीन चार वर्षांपूर्वी एक घटना घडली होती.


मेधा खोले नावाच्या सायंटिस्ट ब्राह्मण महिलेने शुद्र/ओबीसी जातीच्या निर्मला यादव या मराठा महिलेवर असा आरोप केला होता की निर्मला यादवने जात लपवून तिच्या घरात स्वयंपाक केला व त्यामुळे ब्राह्मणांचे देव विटाळले. शूद्रांच्या स्पर्शाने सोवळ्यातील ब्राह्मणांना व त्यांच्या देवांना विटाळ होत असतो असे ब्राह्मणांचे धर्मग्रंथ सांगतात.  ब्राह्मण मेधा खोले या बाईने निर्मला यादव नावाच्या मराठा महिले बरोबर केलेला व्यवहार हा प्रासंगिक अस्पृश्यतेचे अलीकडचे उदाहरण आहे.


मुस्लिमांच्या बरोबर होत असलेला अस्पृश्यतेचा हा व्यवहार आता सार्वत्रिक होत असून तो अत्यंत दुःखदायक व मानवी मूल्यांची अवहेलना करणारा आहे. 


बृहदरथाची हत्या केल्यानंतर ब्राह्मणांनी बौद्ध धर्मीय लोक व बौद्ध भिक्खूंच्या विरोधात घृणा व तिरस्काराचे अभियान चालवले. भविष्यात कधीही शूद्रांनी ब्राह्मणांना आवाहन देऊ नये म्हणून शूद्रांना असमान दर्जा असलेल्या ६००० जातीत विभाजित करून त्यांना शक्तीहीन केले.


६००० जाती निर्माण केल्या तरी ब्राह्मणांचे समाधान झाले नव्हते. जाती-जातींच्या मध्ये सुसंवाद होऊन त्या जाती पुन्हा एकत्र येऊ शकतात. असे होऊ नये यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त करणे आवश्यक होते. त्यासाठी ब्राह्मणांनी या जातींपैकी काही जातींना कायमचे अस्पृश्य / वर्णबाह्य घोषित केले.


अस्पृश्य पूर्वी कोण होते ? या पुस्तकात , अस्पृश्य बनवण्यासाठी ब्राह्मणांनी बौद्धांच्या विरोधात घृणा व तिरस्काराचे अभियान चालवले होते अशी थिअरी बाबासाहेबांनी मांडली आहे. या थिअरी नुसार बौद्धांच्या विरोधात घृणा व तिरस्काराचे अभियान कोणत्या थराला गेले असावे याचा अनुमान आज मुस्लिमांच्या बरोबर होत असलेल्या व्यवहाराने बांधता येतो. बौद्धांच्या बरोबर ज्या पद्धतीने घृणा व तिरस्काराचे अभियान ब्राह्मणांनी चालवले व त्यांना अस्पृश्य बनवले अगदी त्याच पद्धतीने मुस्लिमांच्या विरोधात असे अभियान चालवले जात आहे व त्याचाच परिणाम म्हणून आज मुस्लीम लोकांच्या बरोबर अस्पृश्यता बाळगणे सुरू झाले आहे. यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या मीडियाचा वापर ब्राह्मणांनी खुपच चलाखीने केला आहे.


हिंदी न्यूज चॅनल मधील गोस्वामी , कश्यप , देवगण इत्यादी पाळलेली कुत्री रोज वेगवेगळ्या पद्धतीने मुस्लिमांच्या विरोधात भुंकत आहेत. मराठी न्यूज चॅनल मधील कुलकर्णी , जोशी , देशपांडे , निरगुडकर ही कुत्री जास्त न भुंकता अचानक चावा घेत आहेत. सुरवातीच्या काळात या मीडियाने निरपराध मुस्लिम तरुणांना आतंकवादी म्हणून प्रोजेक्ट केले. मीडियाच्या या प्रचाराचा खूपच परिणाम झाला.


मुस्लिमांनी सुद्धा स्वतःचा बचाव करण्यासाठी ही गोष्ट मान्य करायला सुरुवात केली होती व काही मुस्लिम भटकले असतील म्हणून सर्वच मुस्लिमांना दोष दिला जाऊ नये असे त्यांच्या कडून सांगितले जाऊ लागले होते. लव जिहाद , गोमांस या गोष्टींचा या मीडियाने प्रचार करून मुस्लिमांच्या बद्दलचा घृणा व तिरस्कार एवढा वाढवला की त्यातूनच मॉब लिंचिंग झाल्या आणि जाहीर हत्या घडवून आणल्या गेल्या.


भारतात लॉक डाऊन घोषित झाल्यावर काही दिवसात मरकज येथील तबलिग जमातीच्या विरोधात असे काही वातावरण या मीडियाने तयार केले की दाढी टोपी घातलेला प्रत्येक मुसलमान हा भारतातील मानवी बॉम्ब आहे. मुस्लिमांच्या विरोधात घृणा व तिरस्काराचे अभियान चालवणारी मीडिया मधील ही तीच कुत्री आहेत ज्यांनी पुर्वी राज ठाकरे व अण्णा हजारे ला प्रोजेक्ट करुन नेते बनविले. दलित , हरीजनांच्या नेत्यांनाही यांनीच प्रोजेक्ट करून नेते बनविले. 


बाबासाहेबांच्या दृष्टीने पुरोगामी व सनातनी ब्राह्मण हे एकच होते पण मीडियाने प्रोजेक्ट केलेल्या या हरिजन, दलित नेत्यांना आज काही ब्राह्मण पुरोगामी वाटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व तुकाराम महाराजांच्या काळात एकही ब्राह्मण पुरोगामी नव्हता. राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुलेंच्या व शाहू महाराजांच्या काळात एकही ब्राह्मण पुरोगामी नव्हता. असे असते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला नसता , जगद्गुरू तुकोबांचा छळ व हत्या रोखण्यासाठी एखादा पुरोगामी ब्राह्मण नक्की आला असता.  राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी एखाद्या पुरोगामी ब्राह्मणाची सावली त्यांच्या मृतदेहावर पडावी अशी इच्छा व्यक्त केली असती. शाहू महाराजांनी ब्राह्मणांना लांडग्यांच्या कळपाची उपमा दिली नसती...  बाबासाहेबांनी ब्राह्मणांना संघटनेत , पक्षात प्रवेश देऊ नका असा इशारा देण्या ऐवजी पुरोगामी व चांगल्या ब्राह्मणांना संघटनेत , पक्षात प्रवेश द्या असे सुचवले असते.


मग ह्या पुरोगामी व चांगल्या ब्राह्मणांचा जन्म कधी झाला ? या पुरोगामी ब्राह्मणांच्या जन्माचे गुपित प्रौढ मताधिकारात लपले आहे.  प्रौढ मताधिकार नसता तर अजून एकाही पुरोगामी ब्राह्मणाने जन्म घेतला नसता. प्रौढ मताधिकाराने भारताचा राजा निवडण्याचा अधिकार बहुजन समाजाला दिला म्हणून पुरोगामी होणे ही ब्राह्मणांची गरज बनली आहे. ज्या धर्म ग्रंथांनी शुद्र व अस्पृश्यता निर्माण केली त्या धर्मग्रंथांची होळी करण्याची भूमिका अजून एकाही पुरोगामी ब्राह्मणाने घेतली नाही.  आतापर्यंत ब्राह्मणांनी सर्व आंदोलनांचे नेतृत्व केले पण जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी एकाही ब्राह्मणाने पुढाकार घेतला नाही.  उलट जबरदस्तीने लादल्या जात असलेल्या मुस्लिमांच्या नविन अस्पृश्यते बद्दल सर्वच पुरोगामी ब्राह्मण मूग गिळून गप्प बसले आहेत.


यामध्ये मुस्लिमांच्यामध्ये असलेल्या सामाजिक , राजकीय दूरदृष्टीचा अभाव ही सुद्धा सर्वात मोठी समस्या आहे. राष्ट्रीय पातळीवर मुस्लिमांना नेतृत्व नाही.  गल्ली , मोहल्ला , तालुका , जिल्हा व राज्य पातळीवरील नेतृत्व या राष्ट्रीय समस्येवर रणनीती बनवू शकत नाही. ज्यांच्या कडे रणनीती नाही ते युद्ध लढू शकत नाहीत. या समस्येमुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , भटक्या विमुक्त जाती व ओबीसींच्या समोर सुद्धा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. याच वर्गाला ब्राह्मण हिंदू बनवून त्यांचा वापर मुस्लिमांच्या विरोधात करत आहेत.


भारत , पाकिस्तान , अफगाणिस्तान , बांगलादेश या भागातील पूर्वाश्रमीच्या बौद्ध लोकांनी धर्मांतरे केली. त्या त्या काळात जो योग्य पर्याय मिळाला त्यानुसार त्यांनी धर्मांतरे केली. गैरबाराबरी , भेदभाव , स्पृश-अस्पृश्यता मानणारा धर्म त्यांनी सोडला.  आजचे मुस्लिम , ख्रिश्चन , शीख , लिंगायत , अनुसूचित जाती - जमाती , भटक्या विमुक्त जाती व ओबीसीचे लोक पूर्वाश्रमीचे बौद्ध लोक आहेत, मूलनिवासी नागवंशी लोक आहेत. 


भारतीय संविधानाला अपेक्षित समता , स्वतंत्रता , बंधुता व न्यायावर आधारित नविन व्यवस्था निर्माण करण्यासाठी या लोकांनी एकत्र येऊन प्रतिनिधीत्वाच्या आधारे मोर्चा बनवणे हा या समस्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग शिल्लक राहिला आहे. या संविधानिक व्यवस्थेत ब्राह्मणांचे त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व असले पाहिजे. ब्राह्मणांनी हजारो वर्षे अन्याय केला पण त्यांच्या बरोबर सुद्धा न्याय झाला पाहिजे.


- ऍड. राहुल मखरे

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA