साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्याचे आवाहन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती करीता अर्ज करण्याचे आवाहन


ठाणे


मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग,मातंग मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोरोडी मादगी ,मादिगाया 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात ‍शिक्षण घेतलेल्या व सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी ,12 वी,पदवी, पदव्युत्तर,वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडुन सरासरी 60 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती करिता अर्ज ९ ऑगस्ट पर्यंत करावे.असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे,विकास महामंडळ ठाणे यांनी केले आहे.


जेष्ठता व गुणानक्रमांकानुसार प्रथम 03 ते 05 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे.अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला,रेशनकार्ड,आधार कार्ड,शाळेचा दाखला,मार्कशीट,2 फोटो,पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ.सह दोन प्रतित आपले पुर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे,विकास महामंडळ (मर्या)जिल्हा कार्यालय ठाणे,जिल्हाधिकारी कार्यालय,5 वा मजला,ठाणे-400601 फोन नं.022-25388413 येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.


माजी सैनिक,माजी सैनिक विधवा युध्द विधवा यांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयठाणे/पालघर यांच्या कार्यक्षेत्रात नोंदणीकृत माजी सैनिक,माजी सैनिक विधवायुध्द विधवा व त्यांचे अवलंबित यांना आवाहन करण्यात येते कीज्यांचे पाल्य शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये शालांत परिक्षा (इ. १० वी) उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (इ. १२ वी)डिप्लोमा आणि पदवी परिक्षेमध्ये ६०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत आणि शै. वर्ष २०२०-२१ मध्ये पुढील शिक्षण घेत आहेतअशी पाल्य शिष्यवृत्ती मिळणेकरीता पात्र आहेत. पात्र माजी सैनिकांनी शिष्यवृत्ती मिळणेकरीता अर्ज दि. १० ऑक्टोबर २०२० पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयठाणे येथे सादर करावेत. अर्ज मिळणेकरीता माजी सैनिकांनी स्वत:च्या Email वरुन या कार्यालयाच्या Email ID : ben.zswothane@gmail.com वर संपर्क करावा जेणेकरुन त्यांना ईमेलद्वारे अर्ज पाठविण्यात येईल. अधिक माहितीसाठी ०२२-२५३४३१७४ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे यांनी केले आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या