सर्व प्रभाग समित्यांमध्ये टेस्टींग सेंटर्सचे नियोजन आणि वेबिनारच्या माध्यमातून नगरसेवकांशी संवाद

सर्व प्रभाग समित्यांमध्ये टेस्टींग सेंटर्सचे नियोजन आणि वेबिनारच्या माध्यमातून नगरसेवकांशी संवाद


ठाणे 


अँटीजन किटसच्या माध्यमातून चाचणी करण्यासाठी येत्या शुक्रवारपर्यंत सर्व प्रभाग समित्यांमध्ये टेस्टींग सेंटर्सचे नियोजन करून सोमवारपासून या सर्व ठिकाणी चाचणी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. या संदर्भात त्यांनी आज परिमंडळ उप आयुक्त तसेच सर्व प्रभागांचे सहाय्यक आयुक्त यांची बैठक घेवून अँटीजन किटसच्या माध्यमातून चाचणी करण्यासाठी कोणत्या प्रकारची यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे याविषयीच्या सूचना दिल्या.


सद्यस्थितीत चार ठिकाणी ही सेंटर्स कार्यान्वित करण्यात आली असून येत्या शुक्रवारपर्यंत सर्व प्रभाग समितीमध्ये ही सेंटर्स सुरू करण्याबाबत नियोजन करून ती सेंटर्स तेथील फिव्हर ओपीडीसी संलग्न करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या. दरम्यान चाचणीचा अहवालानुसार बाधित रूग्णास वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अभिप्रायानुसार त्यास कुठे दाखल करायचे आहे याचा निर्णय घेण्यात येणार असून त्यानुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही प्रभाग समिती स्तरावर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी परिमंडळ उप आयुक्त आणि सर्व सहाय्यक आयुक्त यांना दिल्या.


महापालिकेच्यावतीने २ जुलै रोजी लाॅकडाऊन जाहिर केल्यानंतर महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार सर्वेलन्सची रियल टाईम आकडेवारी प्राप्त व्हावी यासाठी मोबाईल ॲपच्यामाध्यमातून सर्वेलन्स करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सिम्प्टो या मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्वेलन्स करण्याचा निर्णय घेण्यात आला.  यासाठी प्रभाग समितीनिहाय आवश्यक ती पथके तयार करून त्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरोघरी जावून कसे सर्वेक्षण करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार प्रभाग समितीनिहाय पथकांनी घरोघरी जावून गेल्या १२ दिवसांत जवळपास ५ लक्ष, ३ हजार, ७७५ इतक्या लोकांचे सर्वेक्षण केले आहे.कोवीड-19 च्या अनुषंगाने महापालिकेच्यावतीने करण्यात येणा-या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि नगरसेवक यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याच्यादृष्टीने आता वेबिनारच्या माध्यमातून नगरसेवकांशी संवाद साधण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी प्रभागनिहाय दक्षता समिती स्थापन करण्याबाबत महापौर नरेश गणपत म्हस्के, उपमहापौर, सर्व नगरसेवक आणि महापालिका आयुक्त यांनी वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधला होता. या चर्चेमध्ये प्रभाग समितीनिहाय अथवा परिमंडळनिहाय वेबिनारच्या माध्यमातून अशी चर्चा व्हावी असा प्रस्ताव पुढे आला त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी हा निर्णय घेतला. या वेबिनारच्या माध्यमातून कोवीड-19 च्या अनुषंगाने जी उपाययोजना करण्यात येत आहे. त्याविषयीची चर्चा तसेच कोरोना कोवीड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी काय करण्याची गरज आहे याविषयी चर्चा होणार आहे.


हा वेबिनार 15 जुलै पासून सुरु होणार असून 15 जुलै रोजी परिमंडळ-1 (कळवा), उपआयुक्त मुंब्रा व दिवा प्रभाग समिती, 16 जुलै रोजी परिमंडळ-2 (वागळे-नौपाडा-कोपरी), तर दिनांक 17 जुलै रोजी परिमंडळ-3 मधील (उथळसर, माजिवडा-मानपाडा, वर्तकनगर आणि लोकमान्यनगर-सावरकरनगर) समित्यांची बैठक दुपारी 1 ते 3 या वेळेत होणार आहेत.
या बैठकीमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्या यांच्याबरोबरच संबंधित प्रभाग समितीचे सर्व नगरसेवक, परिमंडळ उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता आणि संबंधित प्रभाग समितीमधील आरोग्य केंद्रांचे वैद्यकिय अधिकारी सहभागी होणार आहेत.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA