जिल्हा लॉकडाऊन, तरीही लोटेतील एका कंपनीत कर्मचार्याची बस मध्यप्रदेश मधून दाखल
पुष्कर केमिकल कंपनीतील प्रकार
खेड :
कोरोना चा वाढता फैलाव लक्षात घेऊन ८ जुलै पर्यंत जिल्ह्यात कडक लाँकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा - महाविद्यालयासह सर्वच बंद आहे. आँपरेशन ब्रेक द चेन साठी जिल्हाधिकार्यानी हा निर्णय घेतला आहे. या लाँकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही जिल्ह्यातुन बाहेर व जिल्ह्यात येण्याची परवानगी नाही. असे असताना ही शासनाचे आदेश पायदळी तुडवत लोटे औद्योगिक वसाहतीतील पुष्कर कंपनीच्या मजुरांची एक बस थेट मध्यप्रदेश हून कंपनीत दाखल झाली. ३२ कामगारांना घेऊन ही बस लोटे येथे आलीच कशी ? त्या कामगारांची आरोग्य तपासणीचे काय ? त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार का ? असे विविध प्रश्न विचारीत आज कंपनीच्या गेटवर लोटेतील ग्रामस्थानी धडक दिली. त्यामुळे गडबडलेल्या कंपनी प्रशासनाच्या अधिकार्यांनी ग्रामस्थांना थातुरमातुर उत्तरे देऊन कंपनीच्या गेटवरुन काढता पाय घेतला.
लोटे औद्योगिक वसाहतीत दिवसेंदिवस कोरोना चा फैलाव वाढत आहे. गेल्या आठ दिवसात एका नामांकित कंपनीत पंधरा कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहत व नजीकची गावे भितीच्या छायेखाली आहेत. असे असताना पुष्कर कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या उत्तरांमुळे समाधान न झालेल्या ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोद चाळके यांच्या मोबाईल वरुन प्रातांधिकारी सोनोने यांच्याकडे संपर्क साधला. पंरतु या संदर्भात माझ्या कडे कोणतीही माहिती नाही. मी माहिती घेऊन आपणास कळवतो असे त्यांनी सांगितले.
त्यामुळे शासनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा. तसेच कोणतीही परवानगी नसताना आलेल्या त्या ३२ मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना २८ दिवस क्वारंटाईन करण्यात यावे अशी मागणी उपस्थिती पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी लोटेचे माजी उपसरपंच रवींद्र गोळवळकर, धामणदेवीचे उपसरपंच सचिन देवळेकर, धामणदेवीचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत दळी, लोटेचे माजी सरपंच पप्पू चाळके, भाजपचे तालुकाप्रमुख विनोद चाळके, लोटे उपसरपंच सचिन चाळके, लोटे तंटामुक्त अध्यक्ष व पोलीस पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
आमच्या कंपनीत सकाळी ९ वाजता ३२ मजुर घेऊन ही बस आज दाखल झाली. पण आम्ही त्या मजुरांना कंपनीच्या एका सभागृहात ठेवले आहे. त्यांची मध्यप्रदेशला आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. अशी माहिती कंपनीचे अधिकारी प्रभाकर आंब्रे यांनी दिली.
मुळात हे पंरप्रतिय मजूर आणण्याची गरज का भासली, आपल्या जिल्ह्यात कामगार उपलब्ध नाहीत असा होतो का?
सद्यस्थिती एवढी गंभीर असतानाही परराज्यातुन मजूर अर्थात कामगार का मागवले,यामागील कंपनीचा उद्देश काय?लॉकडाऊन मध्ये मुंबई पुणे किंवा इतरत्र राहणाऱ्या चाकरमानी बांधवाना ही गावी येणे जाणे शक्य होत नाही,
अश्यावेळी पुष्कर कंपनी बाहेरील राज्यातून कामगार का आणते?याचा अर्थ आपल्या जिल्हातील स्थानिक भूमिपुत्रांना सर्वांकडे नोकऱ्या व्ययसाय आहेत, व आजूबाजुच्या जिल्ह्यातील तरुणांना ही रोजगार व्यवसाय आहे, मग आपण नेहमी का ओरडतो स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाहीत? आता हीच वेळ आहे,मुळापर्यत जाण्याची भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याची,
लोकांची कोरोना आपत्ती प्रसंगी ही बाहेरील राज्यातील कामगार आणण्याची हिम्मत झालीच कशी, हा लढा फक्त लोटे किंवा आजूबाजूच्या गावांचा नाही सर्व तालुका जिल्ह्यातील बेरोजगार कामगारांचा आहे, या कोरोना आपत्ती वेळी आपल्या जिल्ह्यातुन पाहुणचार घेऊन त्याच्या गावी पळालेल्या परप्रांतीयांना पुन्हा आपल्या जिल्ह्यात नको, कंपनीतील अधिकारी वर्गाला ही विनंती आहे,चुकीच्या मार्गाने परराज्यातुन आणलेल्या कामगारांना सुरक्षित त्यांच्या गावी परत पोहचवा आणि स्थानिक कामगार घ्या, पुष्कर कंपनी असो किंवा दुसरे कोणी कंपनी असो80% कामगार हे स्थानीकच आसले पाहिजेत,आणि मराठी भाषिक असावेत असा जीआर आहे, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही - मुक्तराज महाडीक
0 टिप्पण्या