Top Post Ad

वाघवळीवाडा बुद्धलेणी प्रकरणी भदंत शिलबोधी यांच्या लढ्याची दखल

वाघवळीवाडा बुद्धलेणी प्रकरणी भदंत शिलबोधी यांच्या लढ्याची दखल


नवी मुंबई


येथील उलवे परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ घातले असून वाघवळीवाडा बुद्धलेणी च्या संवर्धन व पुनर्वसनाचा प्रश्न पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय संघटनेने उचलला आहे,  भदंत शिलबोधी यांच्या नेतृत्वात संविधानिक लढा उभारला असून या लढ्याला घवघवीत यश मिळत आहे.  भदंत शिलबोधी यांनी लेणीचे जतन नाही केले तर भारतासह जगातील भिक्खू संघ आंदोलनात उभारतील आणि जागतिक प्रश्न निर्माण होईल असा जाहीररित्या इशारा दिला. 
        आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्माणअंतर्गत येथिल गावचे पुनर्वसन करण्यात येत आहे, प्राचीन व ऐतिहासिक लेणी मध्ये स्थानिक गावकऱ्यांनी केरुमाता देवीची प्रतिष्ठापना केली. या लेणीचे जतन व संवर्धन केले आहे, सिडको प्रशासनाने केरुमाता देवीचे पुनर्वसन केले मात्र लेणीचे विद्रुपीकरण करून त्यावर माती टाकून लेणीचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला आहे,   सदर घटनेची चाहूल पँथर योद्धा वीरेंद्र लगाडे यांना लागली असता पँथर डॉ राजन माक्निकर यांना माहिती दिली आणि पँथर योद्धा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिलबोधी यांच्या नेतृत्वाखाली लेणी बचाव आंदोलनास सुरुवात केली,


OBC नेते राजाराम पाटील मागील ४ वर्षांपासून पुनर्वसन आंदोलन करत असून लेणी बचावासाठी प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगाने पँथर ऑफ सम्यक योद्धा या राष्ट्रीय समाजसेवी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत आहे. नवी मुंबई रिपाई नेते महेश खरे यांनी प्रकरणाचे महत्व जाणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना लेणी संवर्धनासाठी प्रत्यक्ष पाहणी करण्यास भाग पाडले.  कोणत्याही परिस्थितीत लेणीचे संवर्धन व पुनर्वसन करण्यात येईल, लेणी अवशेषांचे जतन करून  बौद्ध स्तूप उभारण्यात येईल या बद्दल पुरातत्व खाते आणि मुख्यमंत्यांना पत्र पाठवेन अशी प्रसारमध्यांना पुढे बोलतांना आठवले यांनी ग्वाही दिली. यावेळी पँथर श्रावण गायकवाड, पँथर डॉ राजन माकणीकर, वीरेंद्र लगाडे, OBC नेते राजाराम पाटील, पनवेल उपमहापौर जगदीश गायकवाड, सुरेश बारशिंग, रिपाई नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओव्हाळ, आदी अनेक मान्यवर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


   पुज्य भदंत व त्यांच्या टीमने घेतलेल्या लेणी बचाव आंदोलनाच्या आंदोलनात संविधानतज्ञ सुरेश माने, ना. रामदास आठवले यांच्या आगमनाने आंदोलनाला एक सकारात्मक दिशा लाभली असून असंख्य राजीकय पक्ष प्रमुखांनी आंदोलनात सहभागी असल्याचे सांगितले आहे. रिपाई डेमोक्रॅटिकचे युवाध्यक्ष कनिष्क कांबळे, रिपाई (खरात) राजाराम खरात यांनी आंदोलनास पाठिंबा असल्याचे सांगून लवकरच भेट देणार असल्याचे दूरध्वनीहून सांगितले. सदर देणीच्या संवर्धन व आंदोलनास भारतातील इतिहासप्रेमी, लेणी अभ्यासक व अनुयायांनी सहभागी व्हावे असे आवाहन भदंत शिलबोधी यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com