'नमो अॅप' बंद करण्याची पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
मुंबई-
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे 'नमो अॅप' बंद करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केली. मोदी यांचे अधिकृत मोबाइल फोन अॅप 'नमो अॅप' गुप्तपणे गोपनीयता सेटिंग्ज बदलतात आणि अमेरिकेतील थर्ड पार्टी कंपन्यांना डेटा पाठवत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
चव्हाण म्हणाले की, नमो अॅप भारतीयांच्या गोपनियतेचे उल्लंघन करत आहे. चव्हाण यांनी ट्वीट करत लिहिले की, मोदी सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी घालून 130 कोटी भारतीयांच्या गोपनीयतेचे संरक्षण केले हे चांगले आहे. नमो अॅप देखील 22 कोटी लोकांचा डेटा गोळा करून, गोपनीयता सेटिंग्ज बदलून अमेरिकेतील थर्ड पार्टी कंपन्यांकडे पाठवून भारतीयांच्या गोपनीयतेचे उल्लंघन करते.
भारत सरकारने देशाच्या सार्वभौमत्व, अखंडतेसाठी आणि सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचे सांगत टिक टॉक आणि यूसी ब्राउझरसह चीनच्या 59 अॅपवर सोमवारी बंदी घातली. भारत-चीन सीमेवर नुकत्याच गलवान ख्रोयात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
0 टिप्पण्या