Top Post Ad

पीपल्स एज्युकेशन सोसायटीकरिता निधी मंजूर

पीपल्स एज्युकेशन सोसायटीकरिता आर्थिक निधी मंजूरमुंबई


पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयास ग्रंथालय बांधकाम, ग्रंथालयातील सोयी सुविधा, वाणिज्य व विधी महाविद्यालयाची डागडुजी आणि महाड येथील सुभेदार संवादकर वसतिगृह बांधकाम यासाठी मिळून १२ कोटी ७९ लाख ७४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून येत्या दोन दिवसांत याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याचे मुंडे म्हणाले


या बैठकीस विभागाचे मुख्य सचिव पराग जैन, सहसचिव दिनेश डिंगळे, समाज कल्याण आयुक्त प्रवीण दराडे यांसह विभागाचे महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयास ग्रंथालय बांधकाम, ग्रंथालयातील सोयी सुविधा, वाणिज्य व विधी महाविद्यालयाची डागडुजी आदि कामे प्रलंबित होती व ती तातडीने करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती. सामाजिक न्याय विभागाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी मुंबई स्थित पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या ग्रंथालय बांधकामासाठी ४ कोटी ९४ लाख ३६ हजार ७०० रुपये, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व विधी महाविद्यालय या इमारतीच्या डागडुजी साठी १ कोटी ९९ लाख ७१ हजार ८७२ रुपये, तसेच सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ४ कोटी ४९ लाख २५ हजार रुपये आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाड जि. रायगड येथे सुभेदार संवादकर वसतिगृह बांधकामासाठी १ कोटी ३६ लाख ४० हजार ६०३ रुपये इतकी रक्कम प्रस्तावित करण्यात आली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com