Top Post Ad

जास्तीची रक्कम परत मिळण्याची शक्यता ; ठामपा पाठवणार रूग्णालयांना नोटीस

ठामपा लेखा परीक्षक विभागाने सुरू केली कोवीड रूग्णालयांची झाडाझडती
जादा आकारणी केल्याचे सिद्ध झाल्यास रूग्णास परत मिळणार वाढीव रक्कम 
१९६ अक्षेपित देयके, २७ लाख रूपयांची अक्षेपित रक्कम, रूग्णालयांना पाठवणार नोटीस



 ठाणे


 कोरोना बाधित रूग्णांकडून जादा बिल आकारल्याचे सिद्ध झाल्यास सदरची वाढीव रक्कम तात्काळ रूग्णांच्या खात्यात परत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. महापालिकेने घोषित केलेल्या खासगी कोवीड रूग्णालयांसाठी मुख्य लेखा परीक्षकांच्या अधिपत्त्याखालील विशेष पथकाने शहरातील 15 कोवीड रूग्णालयांची तपासणी करून जवळपास 27 लाख रूपयांची 196 आक्षेपित देयकांची नोंद केली आहे. या सर्व रूग्णालयांना महापालिकेने नोटीस देण्याची कार्यवाही सुरू केली आहे.


      महापालिकेने खासगी कोवीड रूग्णालयाने त्यांच्याकडे दाखल झालेल्या कोरोना बाधित रूग्णांकडून किती देयक आकारावे याच दर यापूर्वीच निश्चित केले असून त्यानुसार रूग्णालये आकारणी करतात किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक किरण तायडे यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक नेमण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला होता.  त्यानुसार या पथकाने महापालिका हद्दीमधील जवळपास 15 खासगी कोवीड रूग्णालयांची तपासणी केली. त्यांनी कशा प्रकारे रूग्णांना देयक आकारले आहे याची तपशीलवार माहिती घेतली. या पथकाकडे 15 कोवीड रूग्णालयांमधून आतापर्यंत एकूण 1752 देयके प्राप्त झाली आहेत. त्यापैकी 486 देयकांची या पथकाने तपासणी करून एकूण 196 आक्षेपित देयकांची नोंद केली आहे. या एकूण 196 आक्षेपित देयकांची रक्कम ही 27 लाखांपेक्षा जास्त आहे.


      या सर्व आक्षेपित देयकांबाबत संबंधित रूग्णालयांकडून तात्काळ खुलास मागविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. संबंधित रूग्णालयांकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर त्याची शहानिशा करून ज्या रूग्णालयांने एखाद्या रूग्णांकडून वाढीव रक्कम वसूल केल्याचे सिद्ध झाल्यस ती जादा आकारण्यात आलेलली रक्कम संबधित रूग्णाच्या खात्यावर परत करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार या सर्व रूग्णालयांना नोटीस बजाविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com