खाजगी रुग्णालयांची मनमानी थांबवा- आमदार बाळाराम पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

खाजगी हॉस्पिटलच्या मनमानीला चाप लावण्यासाठी बेडची संख्या दररोजच्या दररोज जाहिर करावी
पनवेल महानगरपालिका व नवी मुंबई महानगरपालिकेकडे आमदार बाळाराम पाटिल यांचे निवेदन.


उरण


उरणमध्ये खाजगी रुग्णालयांचा मनमानी कारभार सुरु असून जाणून बुजुन बेडची संख्या लपविली जात आहे. त्याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्य सेवेवर होत आहे  या बेकायदेशीर बाबी पुन्हा पुन्हा घडू नये व रुग्णांना वेळेत योग्य ते उपचार मिळावेत तसेच रूग्णांनाही कोणत्या हॉस्पिटल मध्ये किती बेड आहेत, त्यामध्ये ICU बेड किती आहेत ? तेथे रुग्णासाठी बेड उपलब्ध  आहे की नाही याची त्वरित व अचूक माहिती मिळावी म्हणून शासनाने सर्वच खाजगी हॉस्पिटल मधील बेडची संख्या, रूग्णासाठी उपलब्ध असलेले बेडची संख्या याची नियमित माहिती दररोज एका विशिष्ट वेळेला संबंधित विभागातील नगरसेवक, लोकप्रतिनिधिंना द्यावी. तसेच ही बेडची नियमित माहिती महानगर पालिकेच्या वॉररूम, डैशबोर्ड वरही लावावी. अशी मागणी आमदार बाळाराम पाटिल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,आरोग्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.


महाराष्ट्र शासनाने करोना रोगाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत करोना रोगावरिल उपचारासाठी खाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याची मुभा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थाना दिली आहे. तसेच खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या एकूण बेड पैकी 80 टक्के बेड करोना रोंगा वरिल उपचारासाठी राखीव ठेवणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे.असे असताना सुद्धा बरेचसे रुग्ण हे रुग्णालयात  बेड न मिळाल्या कारणाने मृत्युस सामोरे गेलेले आहेत. म्हणून आपण ही मागणी करत असल्याचे पाटील म्हणाले.


करोना रोगामुळे देशात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या प्रसंगी रुग्णांना योग्य व कमी पैशात सेवा देण्याऐवजी काही खाजगी रुग्णालये हे नफा कमविण्याच्या मार्गावर आहेत. नफा कमविण्याच्या नादात रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सर्रासपणे सुरु आहे. यातच रायगड जिल्ह्यातील पनवेल व नवी मुंबई सारख्या प्रगत शहरातील खाजगी व बलाढ्य रुग्णालय हे करोनाग्रस्त रूग्णावर उपचार करत आहेत. करोनाग्रस्त हा श्रीमंत आहे की नाही याची पाहणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. करोना आजार तसेच अन्य आजारावर किती उपचार खर्च आकारायचे याचे दरही सरकारने निश्चित करून दिले आहेत. हा कायदा असूनही शहरातील खाजगी रुग्णालये करोना रुग्ण आणि अन्य आजार असलेल्या रुग्णांची लूट करीत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यातच एखादा करोना रुग्ण उपचारासाठी गेला की बेड उपलब्ध नसल्याचे सांगून खाजगी रुग्णालये संबंधित रुग्णाला माघारी पाठवित असल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालय बाबत नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA