नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या गावांना प्रॉपट्री टॅक्स मिळावा
माजी आमदार मनोहर भोईर यांची जे.एन.पी.टी. कडे मागणी
उरण
नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा हि गावे जे.एन.पी.टी. प्रकल्पासाठी पुनर्वसित झालेली असून, या गावांच्या विकासासाठी सध्यस्थितीत उत्पनाचे इतर कोणतेही साधन नाही. पाणीपट्टी, वीजबिल, नालेसफाई व मोकळ्या जागेतील साफसफाई करण्यासाठी ग्रामपंचायतकडे एकही रुपया उत्पनाचा येत नाही. तरी या दोन्ही ग्रामपंचायतिना याआधी दिलेल्या प्रॉपट्री टॅक्स प्रमाणे आताही प्रॉपट्री टॅक्स देण्यात यावा अशी मागणी माजी आमदार मनोहर भोईर यांनी जे.एन.पी.टी. चेअरमन (अध्यक्ष), सह-चेअरमन(उपाध्यक्ष), मा.चिफ मॅनेजर, जे.एन.पी.टी, यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा हि दोन्ही गावे मिळून मूळ जुने गाव शेवा व शेवा कोळीवाडा असे होते. सध्या अस्तित्वात असलेल्या जे.एन.पी.टी. बंदरामधील जे.एन.पी.टी. प्रशासन भवन, ट्रेनिंग सेंटर, गेस्टहाऊस, पंप हाउस या सर्व इमारती या जुना शेवा गावाच्या हद्दीमध्ये जे.एन.पी.टी. बंदर आल्यानंतर बांधकाम केलेल्या आहेत. जे.एन.पी.टी. बंदरासाठी या दोन्ही गावांना विस्थापित केले आहे. जे.एन.पी.टी. चे, सह-चेअरमन(उपाध्यक्ष) उन्मेश वाघ यांच्यासोबत बैठक घेऊन आपण या विषयाकडे तातडीने लक्ष केंद्रित करून नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या गावांना प्रॉपट्री टॅक्स मिळावे हि मागणी माजी आमदार मनोहर भोईर यांनी केली. जे.एन.पी.टी. सह-चेअरमन(उपाध्यक्ष) उन्मेश वाघ यांच्याकडून सदर मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.
0 टिप्पण्या