Top Post Ad

३१ ऑगस्टपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि सर्व शैक्षणिक संस्था बंद

३१ ऑगस्टपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि सर्व शैक्षणिक संस्था बंदनवी दिल्ली


कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. मागील महिन्यात या लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता देण्यात आली आहे. अनलॉक द्वारे हळू हळू व्यवसाय, उद्योगधंदे सुरु करण्यात आले. तरीही  ३१ ऑगस्टपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि सर्व शैक्षणिक संस्था बंद राहतील. ऑनलाइन शिक्षण पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. शैक्षणिक गोष्टी कधी सुरु करायच्या याबाबत पुढे वेगळ्या सुचना जारी केल्या जातील. तसेच ३१ ऑगस्टपर्यंत सर्व कंटेनमेंट झोनमध्ये कडक लॉकडाऊन राहील. असे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केले आहेत.  राज्य सरकारने कंटेनमेंट झोनबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा. कंटेनमेंट झोनबद्दलची माहिती वेबसाइटवर दिली जाईल.फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी परवानगी असेल. राज्य सरकारने प्रत्येक गोष्टींवर बारील लक्ष ठेवावे. या झोनसाठी दिलेल्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन व्हायला हवे.


गृह मंत्रालया (MHA) ने अनलॉक 3 (Unlock 3) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे, त्याद्वारे रात्रीच्या वेळी व्यक्तींच्या हालचालीवरील निर्बंध हटविले गेले आहेत.  अनेक दिवसांपासून मागणी होत असलेले देशातील जिम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. योग संस्था  आणि व्यायामशाळा ५ ऑगस्टपासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनलॉक 3 मार्गदर्शक तत्त्वे 1 ऑगस्ट पासून लागू होतील. ५ ऑगस्टपासून रात्र कर्फ्यू असणार नाही. ५ ऑगस्टपासून व्यायामशाळा सुरू करण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मानक ऑपरेटिंग प्रक्रियेचे (SOP) पालन करणे बंधनकारक असेल.   सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, सभागृह, असेंब्ली हॉल आणि अशा सर्व ठिकाणी बंदी असेल. गृहमंत्रालयाने दिलेल्या मंजुरीशिवाय सर्व प्रकारची आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असतील. तसेच मेट्रो रेल्वे सेवांवरही निर्बंध कायम राहतील. सामाजिक/राजकीय/खेळ/करमणूक/शैक्षणिक/सांस्कृतिक/धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या उत्सवांवरील बंदी कायम असणार आहे. स्वातंत्र्यदिनी सोशल डिस्टेंसिंग आवश्यक. या दरम्यान मास्क घालणे गरजेचे असेल. वंदे भारत मिशन अंतर्गत ठराविक ठिकाणी इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हलला मंजूरी.  कंटेनमेंट झोन बाहेर मेट्रो, सिनेमा हॉल, एंटरटेनमेंट पार्क, बार, ऑडिटोरियम, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजक आणि शैक्षणिक कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर गोष्टींना मंजूरी. 


 

 


  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com