बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून वसईमध्ये प्लाझ्मा दानाला सुरुवात


बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून वसईमध्ये प्लाझ्मा दानाला सुरुवात


वसई


सन्माननीय लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर (आप्पा ), युवा आमदार क्षितिज ठाकूर (दादा ) मा.महापौर प्रविणजी शेट्टी ह्यांच्या संकल्पनेतून केलेल्या आव्हानानुसार बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून साथिया ब्लड बँक नालासोपारा येथे कोविड रुग्णांसाठी लागणारे पालघर जिल्ह्यातले पहिले प्लाझ्मा दान पार पडले.
कोरोनाशी यशस्वी लढा दिलेले देवाळे येथील बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते  भूषण भगवान वर्तक ह्यांनी अत्यवस्थ असलेल्या कोरोनाबाधीत रुग्णाला जिवदान मिळावे ह्या उदात्त हेतूने  महाजन सर ह्यांच्या साथिया ब्लड बँक नालासोपारा येथे आपले प्लाझ्मा दान केले ह्यावेळी मा. नगरसेवक मनिष वर्तक, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी तबस्सुम काजी, साथिया लॅबचे श्री महाजन सर व त्यांचे सहकारी उपस्थित होते .प्लाझ्मा दान पार पडल्यानंतर मा.नगरसेवक श्री मनिष वर्तक व भूषण वर्तक तसेच महाजन सर ह्यांनी कोरोनाशी यशस्वीरित्या लढा दिलेल्या नागरिकांनी न घाबरता जास्तीत जास्त संख्येने प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले.


 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad