Top Post Ad

उप नियंत्रक नरेश वंजारी यांचे शिधापत्रिकाधारकांना आवाहन

शिधावाटप संदर्भांतअडचणी असल्यास उप नियंत्रक शिधावाटप  यांच्याकडे  संपर्क साधा


ठाणे


 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभाध्य्यांसाठी (अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थी ) अतिरिक्त २ किलो गहू व २ किलो तांदूळ प्रति व्यक्ती मोफत वितरण सुरु करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे अधिकृत शिधावाटप दुकानातील ई-पॉस मशिनवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रति शिधापत्रिका किलो धान्य (१८ किलो तांदूळ आणि १७ किलो गहू) दोन रुपये प्रती किलो प्रमाणे गहू व तीन रुपये प्रती किलो प्रमाणे तांदूळ याप्रमाणे मिळणार आहे.शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका साखर १ किलो २० रुपये प्रती किलो दराने मिळणार आहे.प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतीव्यक्ती ३ किलो गहू २ रुपये प्रती किलो दराने आणि प्रतीव्यक्ती तांदूळ २ किलो ३ रुपये प्रती किलो दराने मिळणार आहे.


आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत विस्थापित मजूर ,रोजंदारीवर काम करणारे मजूर व विनाशिधापत्रिकाधारक अशा व्यक्तींना मोफत तांदळाचे वितरण करण्यात येत आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना देखील माहे जुलै-२०२० व ऑगस्ट-२०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दिनांक ०१.०७.२०२० पासून प्राधान्य कुटुंब लाभार्थी य अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना माहे जुलै महिन्याचे नियमित अन्न धान्याचे वितरण करण्यात येत असून आतापर्यंत तांदूळ ३९९२.०२२ मेट्रिक टन आणि गहू ६२५३.1० मेट्रिक टन इक्या अन्नधान्याचे (मंजूर नियतनाच्या 75.51 %) वितरण पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच दिनांक 17.०7.2020 पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत तांदूळ 57.912 मेट्रीक टन आणि गहू ७६.९८१ मेट्रीक टन इतक्या अन्नधान्याचे वितरण करण्यात आलेले आहे.


फ परिमंडळ कार्यक्षेत्रातंर्गत येणाऱ्या सर्व शिधापत्रिकाधारकांना आवाहन करण्यात येते की, आपणास सार्वजनिक  वितरण व्यवस्थेबाबत कोणत्याही अडचणी असल्यास  ०२२-२५३३२६५७ या हेल्पलाईन क्रमाकावर संपर्क साधावा तसेच सर्व शिधापत्रिकाधारकानी अधिकृत शिधावाटप दुकानातून गर्दी न करता सोशल डिस्टसगचे पालन करुन शिधाजिन्नस घ्यावे असे उप नियंत्रक शिधावाटप फ परिमंडळ, ठाणे नरेश वंजारी यांचेकडून आवाहन करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com