Top Post Ad

तुरुंगांच्या बांधकामात होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी

महाराष्ट्रात  जे नवीन तुरुंग नव्हे तर जे कोंडवाडे निर्माण केले जात आहेत, त्यामध्ये टेंडर घेणाऱ्या कॉंट्रेक्टरवर मंत्रालयातील आणि कारागृह प्रशासनातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहें. करोडो रुपयांचे टेंडर घेवून या कोंडवाड्यांचे बांधकाम काही लाख रुपयांमध्ये करवले जातेय..बाकीचे पैसे कॉंट्रेक्टर आणि मंत्रालयातील अधिकारी आणि जेल प्रशासनाचे अधिकारी वाटून घेतात..या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी होऊन भ्रष्ट जेल अधिकारी आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी  सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गोविंद भालेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्य न्यायाधीश -मुंबई हायकोर्ट,, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग-मुंबई , महाराष्ट्र राज्य लाचलूचपत विभाग-मुंबई,  .मुख्यमंत्री -महाराष्ट्र शासन, मुख्य सचिव -महाराष्ट्र शासन, .उपसचिव -तुरुंग डिपार्टमेंट -मंत्रालय, महाराष्ट्र शासन,  अति.सत्र न्यायाधीश-पनवेल सेशन कोर्ट, कारागृह महानिरीक्षक -पुणे यांना पत्र पाठवले आहे.


नवी मुंबईतील  "तळोजा तुरुंगाची" स्थिती "ग्वाण्तानामो जेल" सारखी आहे* *तळोजा तुरुंगात कैद्यांना गुरांसारखे जसे एका कोंडवाड्यात कोंडायचे तसे कैद्यांचे मानवी हक्क डावलून कोंडले जातेय...तळोजा तुरुंगातील कैदी ठेवायचे बराकी कैद्यांचे छळ करण्यासाठी बनविले गेले आहेत...कैद्यांना सूर्यप्रकाश सुद्धा अंगावर घेता येत नाही अशी रचना तळोजा जेलची कऱण्यात आली आहे...कैदी मानसिकता गमावत आहेत.  कैद्यांना जेलच्या आतमधील त्यांच्याच बराकीच्या परिसरात बाहेर फेरफटका मारता येत नाही...पाणी मिळत नाही...पाण्याची खूप भयानक परिस्थिती या तळोजा जेल मध्ये आहे, अगदी शौचालयासाठी सुद्धा पाणी मिळत नाही, पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते, भाई -पटेल -मोठमोठे गुंडांचे या तुरुंगात भाईगिरी असते ,सर्वसामान्य कैद्यांना पाण्याला हाथ लावू न देणे, गरीब कैद्यांना बाटलीभर पाण्यासाठी सुद्धा मारामारी करावी लागते. बाथरूमसाठी पाण्याची टाकी स्वतःसाठी भरून ठेवणे, अशी भाईगिरी असते.,याच तुरुंगात नव्हे तर महाराष्ट्रात आता जिथे जिथे नवीन संकल्पनेनुसार जेल बनविले जात आहेत ती संकल्पना खूप चुकीची आहे.


तळोजा जेलमध्ये कैद्यांची घुसमट सुरु आहे .."टेलिमेडिसिन" ची संकल्पना या तळोजा जेलमधून सुरु झालीय, पण बाहेरील डॉक्टर कैद्यांची तपासणी करणार कसे? कैद्यांना बाहेरील हॉस्पिटलमध्ये पाठवा असे बाहेरील डॉक्टरने सांगितले तरी तुरुंगात जो श्रीमंत कैदी डॉक्टरला पैसे देईल, त्या कैद्यालाच बाहेरील रुग्णालयात तपासणीसाठी नव्हे तर फेरफटका मारण्यासाठी विरंगुळा म्हणून पाठवले जाते, *तुरुंगाच्या हॉस्पिटल डिपार्टमेंटमधील 32 नंबर रजिस्टरवर गरीब कैद्यांचे हॉस्पिटलला पाठविण्यासाठी नाव लिहिले जाते पण ज्या श्रीमंत कैद्याने पैसे वाटले असतात, त्या कैद्याच्या नावावरच बाहेरील पोलीस पथक बोलावले जाते..आणि *त्या "व्ही. आय. पी. कैद्यांना" हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते किंवा ऍडमिट ठेवले जाते. तुरुंगात कैद्यांचे जेवण कसे असते यावरून अनेक वादंग उठत असतात..पण तुरुंगातील जेवण जनावरे सुद्धा खाणार नाहीत असे जेवण असते... भातामध्ये खडे-जव,, भाजीमध्ये किडे -अळ्या,, डाळीत पाणी,, केळे गायब असतात, दुधात पाणी असते,, उपमा -शिरा खाण्यायोग्य नसतो.


तळोजा तुरुंगात "आतील हॉस्पिटल" मधील "बायोमेडिकल वास्ट- मेडिकल कचरा" गेल्या 3 वर्ष्यांपासून तुरुंगातच जाळला जातोय त्यामुळे तुरुंगातील कैद्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत आणि तुरुंगातील स्टाफला सुद्धा ह्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, पण डॉक्टर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात कोणीच आवाज उचलत नाहीत,कारण हा मेडिकल कचरा बाहेर नष्ट करण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा कारागृह अधीक्षक आणि डॉक्टरांच्या खिशात जातो,त्यामुळे मेडिकल कचऱ्यामुळे तुरुंगातील स्टाफ "हवालदार" हे कैद्यांसोबत सतत असतात त्यांना ह्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.तळोजा तुरुंगच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच तुरुंगांमध्ये तुरुंगाचे हवालदार तुरुंगाच्या आतील हॉस्पिटल चे "नर्सिंग ऑर्डरली" बनतात.."नर्सिंगचे प्रशिक्षण नसताना तुरुंगाच्या आतील कैद्यांना हे हवालदार औषधे आणि इंजेकशन देतात," ह्या सर्व कारभाराला जबाबदार कोण ?


"ठाणे सेंट्रल जेलमध्ये" गर्दी वाढत चालल्याने तळोजा तुरुंगात कैद्यांना हलवले जातेय पण तळोजा तुरूंगातून मुंबई मधील "बोरिवली, अंधेरी, बांद्रा, दिंडोशी सेशन कोर्ट" या कोर्टांचे "पोलीस पथक" "नवी मुंबई पोलीस मुख्यालय" पाठवत नाहीत, त्यामुळे कैद्यांचे खटले प्रलंबित होत चालले आहेत आणि तुरुंग तुडुंब भरून वाहत आहेत, तुरुंगात गर्दी वाढल्याने जेल प्रशासनाला भ्रस्टाचार कऱण्यात फायदा जास्त असतो, कॅन्टीन मध्ये भ्रस्टाचार, कैद्यांच्या मेडिकल मध्ये भ्रस्टाचार, कैद्यांच्या अन्नधान्यात भ्रस्टाचार,कैद्यांच्या न्यायालयीन तारखा लावण्यात सुध्दा भ्रष्टाचार असतो, तुरुंगातील पी.डब्ल्यू.डी. बांधकाम विभागात सुध्दा भ्रष्टाचार असतो, अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टींमध्ये ह्या महाराष्ट्रातील तुरुंगांमध्ये भ्रष्टाचार आणि अन्याय -अत्याचार वाढत चालला आहे, ह्या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन त्वरीत कारवाई करावी अशी विनंती प्रदीप भालेकर यांनी केली आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com