इंग्रजांपेक्षा तीन हजार पटीने जास्त धोकादायक


इंग्रजांपेक्षा तीन हजार पटीने जास्त धोकादायक


- गणेशदादा बनसोडे, सोलापूरकर


महाराष्ट्रातला असो वा देशात आपली वर्चस्ववादी व्यवस्था मजबूत करण्यासाठी त्या जातीच्या नेत्याला कशाप्रकारे बहुजन नेत्याच्या विरोधात बोलायला लावून त्याचा कशा प्रकारे वापर करून घेतलं जातं, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पडळकर. जाती जाती मध्ये भांडण लावण्यासाठी ब्राह्मण कशी कटकारस्थान करत असतो ते या लेखावरून आपणास समजेल. बहुजन समाज एकत्र आला तर खूप धोका आहे हे ते जाणून आहेत म्हणून जाती-जातीत, समूहा समूहामध्ये तो वाद लावत असतो. इंग्रजांनी या भारताचे फक्त दोन तुकडे केले होते एक हिंदू आणि दुसरा मुस्लिम पण या देशांमध्ये ब्राह्मणांनी सहा हजार पेक्षा जास्त जाती निर्माण करून बहुजनांची ताकत तुकड्या तुकड्यामध्ये विभागून टाकली. त्यामुळे सहा हजार भागिले 2 केले तर तीन हजार होते म्हणून इंग्रजांपेक्षा हा तीन हजार पटीने जास्त धोकादायक आहे.


खुद्द धनगरांनीच डिपाॅजीट जप्त केलेल्या कर्तृत्वशुन्य पडळकरांना आमदार बनवण्याचे जानवेधारी कारस्थान?


 शिवस्वराज्य टिकावं म्हणुन होळकरांनी स्वतःच रक्त सांडलं पण पेशव्यांनी त्यांचा आतोनात छळ केला, त्याच पेशवाईच्या वारसदारांची हुजरेगिरी करण्याच काम पडळकर  करत आहे. काही दिवसापुर्वी पडळकरांनी शरद पवारांवर जानीवपुर्वक भाष्य केले, पडळकरांचा बोलवीता धनी फडणवीस हेच आहेत हे आख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे..


RSS/बीजेपी महाराष्ट्रात फक्त जाती जातीत भांडणे लावा आणि राज्य करा हीच नीती अवलंबतात, पूर्वी जानकर बारामतीत धनगर समाजाला वेड्यात काढुण झटले. पण सुज्ञ धनगर समाजाने जानकरांची RSS वादी जानवेगिरी उखडुन टाकली, पुढे RSS वादी पडळकरांचा उगम ज्या मनोहर भिडे सारख्या दंगलखोर थेरड्याच्या तालमीत झाला होता, त्याच पडळकरांना कॉँग्रेस राष्ट्रवादी मतांचं धृविकरण करण्यासाठी RSS मार्फत वंचित मधे पाठवण्यात आले हा RSS बीजेपी वंचितचा ठरलेला कार्यक्रम होता, पुढे पडळकरांचा फायदा सांगली बीजेपी उमेदवारावाला कसा करून घेण्यात आला हे लोकसभेला महाराष्ट्राने अनुभवलं, म्हणूनच पडळकरबद्दल प्रकाश आंबेडकर भ्र शब्दही वाईट बोलत नाहीत,


हे पडळकर एका भाषणात बोलतात की बीजेपीने धनगरांशी गद्दारी केली, बीजेपीच्या तिकिटावर जो कुणी उभा राहील त्याला पाडा, कुणीही असो पाडा, विरोबाची  शपथ घेऊन सांगतो माझी आई असो, माझा भाऊ असो, मी जरी असलो तरी मला पाडा.. नंतर हेच पडळकर वंचित मधुन बीजेपीमधे ठरल्याप्रमाणे परतले, परंतु प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून पडळकरांच्या वंचित सोडून BJP प्रवेशावर कोणत्याच वंचित कार्यकर्त्यांनी टिका करायची नाही अस पत्रक खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी काढले होते,


त्यामुळे बीजेपी महाराष्ट्रात फक्त जातीपातीचे राजकारण करत असते, बारामतीत सुज्ञ धनगर समाज बहुसंख्य आहे त्याच मुळे पहिले जानकर आता पडळकर यांना उमेदवारी देऊन धनगर विरूद्ध मराठा असा जातीयवादी RSS अजेंडा बारामतीत खूप काळापासून वापरला जातो परंतु त्यात यशस्वी झाले नाही. बारामतीतल्या धनगरांनी पडळकरांचे डिपाॅजीट जप्त करून त्यांच्या हाती नारळ देऊन वाटी लावले, जानकरांनंतर आता डिपाॅजीट जप्त झालेला पडळकर हाच धनगरांचा नेता आहे हे धनगरांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न RSS मार्फत सुरू आहे, वास्तविक पडळकर हे भविष्यात जातीयवादी विष पेरण्यासाठीचं बीजेपीच हत्यार आहे, उद्या पडळकरांच्या मार्फत मराठा विरूद्ध धनगर असा जातीयवादी प्रचार चालवला जाईल, बारामतीत पडळकरांना धनगरांनी पाडले परंतु मराठ्यांनी माझा पराभव केला असा सुर काढला जाईल, आणि सबंध महाराष्ट्रातील धनगर बीजेपी च्या बाजूने कसे एक होतील हा प्रयत्न आखला जाईल,


एक गोष्ट लक्षात घ्या खडसे, पंकजा, तावडे, ५२ कुळे यांच्या सारखे जेष्ठ लोक डावलुन जर डिपाॅजीट जप्त झालेले कर्तृत्वशुन्य पडळकर पुढे येत असतील तर यात RSS जातीयवादी डोकी काम करत आहेत, बीजेपी/RSS यांचा मुख्य अजेंडा हाच असतो, काम काहीच करायच नाही पण जातीजातीत भांडणे लावा आणि सत्ता काबीज करा, नेहमीप्रमाणे जानकरांनंतर पडळकरांचा सुद्धा वापर झाल्यावर त्यांना फेकुन दिले जाईल यात शंका नाही...


- गणेशदादा बनसोडे, सोलापूरकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA