राजगृहावरील हल्ल्यातील मुख्य आरोपी ठाणे मार्गे भिवंडीला
मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या 'राजगृह'वर मागील आठवड्यात ७ जुलै रोजी हल्ला झाला. यामध्ये घराच्या खिडक्यांची आणि परिसरातील कुंड्यांची मोठया प्रमाणात तोडफोड केली होती. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्य आरोपी अद्यापही सापडलेला नाही. याबाबत एक धक्कादायक माहिती मिळत आहे. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी आरोपी दादर ते ठाणे चालत गेल्याची माहिती मिळाली आहे. ठाण्यातील तीन हात नाका या चौकातील CCTV कॅमेऱ्यामध्ये ही व्यक्ती दिसून आली आहे. ठाण्याच्या तीन हात नाका चौकातून हा आरोपी पुढे भिवंडीच्या दिशेने गेल्याची माहिती मिळत आहे. सदर आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात जरी नसला तरीही लवकरात लवकर त्याला बेड्या ठोकल्या जातील असा विश्वास पोलिसांना आहे.
याप्रकरणी सुरवातीपासून आरोपीबाबत CCTV च्याही माध्यमातून तपास सुरु आहे. या व्यक्तीने केलेली तोडफोड CCTV मध्ये कैद झालीये. याप्रकरणी पोलिसांना तपासादरम्यान दोघांनी हल्ला केल्याचं निष्पन्न झालंय. या पार्श्वभूमीवर कारवाई करत पोलिसांनी ९ जुलै रोजी एकाला ताब्यातही घेतलंय. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव उमेश जाधव असं आहे, तो ३५ वर्षांचा आहे. हा आरोपी बिगारी म्हणून काम करतो. मात्र नोंदवलेल्या जबाबानंतर मुख्य आरोपीला अद्यापही पकडण्यात आलेले नाही. या हल्ल्यानंतर महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'राजगृह' भोवती २४ तास पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलाय,
0 टिप्पण्या