लोकशाही वाचवा देश वाचवा, ठाणे युवक काँग्रेसचे आंदोलनलोकशाही वाचवा देश वाचवा, ठाणे युवक काँग्रेसचे आंदोलनठाणे


लोकशाही वाचवा देश वाचवा अशा घोषणा देत ठाणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन  करण्यात आले. भारत आज कोरोना (कोविद १९ ) महामारी मुळे जगात ३ क्रमांकावर पोचला आहे. कोरोनावर नियंत्रण आणणे त्यासाठी उपाययोजना करणे ही केंद्र सरकारची प्राथमिक जबाबदारी होती. केंद्र सरकारने या महामारीचा विचार न करता लोकतंत्रच्या गळा घोटत मध्यप्रदेश मध्ये लोकांनी निवडून आणलेले सरकार पडण्याचा डाव आखला. महामारीच्या संकटात देशातील जनतेला टाकले. जनतेकडे दुर्लक्ष केले असा आरोप ठाणे (जि)युवक काँग्रेस कमिटीने केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत असतानाच आताही राजस्थानमध्ये सरकार स्थापन्याकरिता डावपेच आखले जात आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसला बहुमत असताना ही येथील राज्यसरकार अस्थिर करून सरकार पाडण्याचा कट रचला जात आहे.  राज्यपालांच्या मदतीने हा प्रयत्न करून पाहणाऱ्या भाजपचा यावेळी धिक्कार करण्यात आला.  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे (जि) युवक काँग्रेस कमिटी ने निषेध व्यक्त करत आंदोलन केले.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव व ठाणे प्रभारी आशिष गिरी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव जिया शेख, ठाणे युवक काँग्रेस उपाध्यक्ष राहील हन्फी, ठाणे युवक काँग्रेस सरचिटणीस लोकेश घोलप, युवक काँग्रेस प्रभाग २२ चे अध्यक्ष प्रवीण खैरालिया,  हृषीकेश तायडे, ठाणे युवक काँग्रेस सचिव सागर लबडे, ठाणे युवक काँग्रेस सचिव निलेश दास, प्रणय विचारे, अक्षय वेदनेकर, रुपेश आहिरवाल,अतिश राठोड,अजय चिंडालिया इत्यादि उपस्थित होते.
 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad