अस्वच्छतेच्या कारणावरून स्वच्छता निरीक्षक जागेवरच निलंबित

महापालिका आयुक्तांचा वागळे प्रभाग समितीचा दौरा


अस्वच्छतेच्या कारणावरून स्वच्छता निरीक्षक जागेवरच निलंबित


ठाणे


महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी आज वागळे प्रभाग समितीतंर्गत शांतीनगर, सीपी तलाव तसेच किसननगर फिव्हर ओपीडीला भेट देवून माहिती घेतली. सकाळी शर्मा यांनी वागळे प्रभाग समितीतंर्गत शांतीनगर परिसरातील सर्व गल्यांची पाहणी केली. तेथील नागरिकांशी साफसफाई बाबत संवाद साधला. त्यानंतर त्यांनी किसननगर फिव्हर ओपीडीला भेट दिली आणि तेथील कामकाजाची माहिती घेतली. दरम्यान सीपी तलाव परिसरातील अस्वच्छतेच्या कारणावरून तेथील स्वच्छता निरीक्षकास जागेवरच निलंबित करून स्वत:च त्याच्या निलंबनाचा आदेश लिहून आस्थापना विभागाकडे दिला. तसेच आज सायंकाळपर्यंत त्या परिसराची साफसफाई करण्याचे आदेश दिले.


यावेळी त्यांनी सीपी तलाव परिसराला भेट देवून स्थानिक नगरसेविका आणि वागळे प्रभाग समिती अध्यक्षा सौ. शिल्पा वाघ, माजी नगरसेवक डाॅ. जितेंद्र वाघ यांच्याशी संवाद साधून तिथल्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी स्थानिक कार्यकर्ते बाबासाहेब कांबळे हेही उपस्थित होते. या पाहणी दौ-यामध्ये उप आयुक्त संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, सहाय्यक आयुक्त विजयकुमार जाधव, कार्यकारी अभियंता धुमाळ आदी उपस्थित होते.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA