Top Post Ad

लॉकडाउनच्या काळात ६५ जणांची आत्महत्या

लॉकडाउनच्या काळात ६५ जणांची आत्महत्या


रायगड


     कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली. चार महिन्यांनंतरही ती पुर्णपणे उठू शकलेली नाही. या टाळेबंदीचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम सर्वत्र दिसून येत आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रांना या टाळेबंदीची झळ पोहोचली आहे. टाळेबंदीचे आता आर्थिक आणि सामाजिक त्याचबरोबर मानसिक दुष्परीणामही दिसून येण्यास सुरुवात झाली आहे.    बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. घरखर्च कसा चालवायचा अशी विवंचना अनेकांना भेडसावू लागली आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव आणि नैराश्य वाढण्यास सुरवात झाली आहे. यातून आत्महत्येसारखी टोकाची पाऊले उचलली जात आहेत. रायगड जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात ६५ जणांनी आत्महत्या केली आहे. तर मानसिक ताणतणाव आणि नैराश्याचे प्रमाणही वाढले आहे.


   रायगड पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या हद्दीत गेल्या चार महिन्यात ६५ आत्महत्यांची नोंद झाली. यात मार्चमध्ये १५, एप्रिलमध्ये ११, मेमध्ये २४ तर जूनमधील १५ आत्महत्यांचा समावेश आहे. या आत्महत्यांमागची कारणे वेगवेगळी असली त्याला टाळेबंदीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची किनार आहे. समाजात वाढत्या मानसिक ताणतणाव आणि नैराश्याचे हे घातक आहे.


   मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे सांगतात, “आत्महत्यांची कारणे वेगवेगळी असू शकतात. प्रत्येकवेळी नैराश्य हे आत्महत्येस कारणीभूत असेल असे नाही. त्याला नकारात्मक विचार, चिंता, अकार्यक्षमता, मंत्रचंचळपणा आणि विकृती कारणीभूत असू शकतात. सध्याच्या एकूण परिस्थितीमुळे मानसिक ताणतणाव आणि नैराश्य वाढत आहेत...!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com