Top Post Ad

लॉकडाऊन वाढवल्यास भारतीय जनता पक्षाकडून आंदोलनाचा इशारा

कोविड-१९ च्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ठाणे महापालिका क्षेत्रात २ जुलैपासून १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर त्याला १९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र लॉकडाऊनच्या काळातही कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. मुंबईमधील काही भागात सम-विषम नियमानुसार दुकाने आणि मर्यादित कर्मचाऱ्यांच्या साह्याने कार्यालये सुरू आहेत. त्यामुळे मुंबईत ठाणेकरांची ये-जा सुरू आहे. मात्र ठाणेकरांचे उपजिविकेसाठी आवश्यक व्यवहारही ठप्प झाले आहेत. त्यामुळे याबाबत जनतेत आक्रोश आहे. लॉकडाऊन हे एक माध्यम आहे. मात्र त्यामुळे कोरोनाला आळा बसलेला नाही. सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी आणि ग्राहक दोघंही कंटाळले आहेत. त्याचप्रमाणे ज्यांचं हातावर पोट आहे त्यांचेही खाण्याचे हाल होत आहेत. लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ करण्याचा निर्णय झाल्यास त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता दिसत आहे.


ठाण्यामध्ये लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या रविवारी संपत असून परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊन वाढवण्याबाबत विचार केला जाईल असं सूतोवाच महापालिका आयुक्तांनी केला आहे. कोरोनावर नियंत्रण यावं म्हणून लॉकडाऊन वाढवल्याचं कारण देण्यात येतं. मात्र रूग्णांच्या संख्येत कुठेच घट होत नसून रोज ३०० च्यावर रूग्ण सापडत आहेत. लॉकडाऊन करण्यापेक्षा लॉकडाऊन न करता कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. व्यापारी वर्गानेही लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.


तसेच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही मीरा-भाईंदरमध्ये बोलताना लॉकडाऊन वाढवण्यास विरोध दर्शवला आहे. इतके दिवस लॉकडाऊनच्या विरोधात ब्र उमटत नव्हता. पण आता अति झाल्यामुळे विरोधाचा सूर उमटू लागला आहे. त्यातच पुढील आठवड्यापासून सण-उत्सवांची सुरूवात होत असल्यामुळं लॉकडाऊन वाढवल्यास त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता दिसत आहे.


भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी तर ठाणेकरांना लॉकडाऊन नको म्हणून पालिकेला  आवाहनही केलं आहे. लॉकडाऊनबाबत जनतेत आक्रोश असून यापुढे लॉकडाऊन वाढवल्यास भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन केले जाईल असा इशारा आमदार निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी दिला आहे. त्याचबरोबर कोविड संसर्ग रोखण्याच्या भविष्यातील उपाययोजनांबाबत भूमिका स्पष्ट करण्याची विनंतीही केली.


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com