चिनी अॅपवर बंदी: पाच भारतीय अॅप्सचा पर्याय

चिनी अॅपवर बंदी: ५ भारतीय अॅप्सचा पर्याय


मुंबई


भारतात #मेकइनइंडिया क्रांतीला सुरूवात झाली असून स्वदेशी अॅप्सच्या अधिकाधिक वापरासह तंत्रज्ञान क्षेत्रातही आत्मनिर्भर बनण्याकडे देशाने वाटचाल सुरु केली आहे. गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरील ५९ चिनी अॅपवर भारत सरकारने नुकतीच बंदी जाहीर केली असून या बंदीचे संपूर्ण देशाने स्वागत केले. या अॅप्सच्या माध्यमातून आपली प्रतिभा जगासमोर मांडणा-या प्रतिभावंतांसाठी भारतीय स्टार्टअप्सनी पुढाकार घेत विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. जाणून घेऊयात या स्वदेशी पर्यायांबद्दल.


१. ट्रेल: भारत सरकारने लोकप्रिय चिनी अॅप टिकटॉकच्या वापरावर बंदी घातल्यानंतर भारतीय कंटेंट निर्माते देशात विकसित झालेल्या ट्रेल अॅपकडे वळले आहेत. या प्लॅटफॉर्मवरही लहान व्हिडिओ तयार कऱण्याची सुविधा आहे. या लाइफस्टाइल कम्युनिटी-कॉमर्स प्लॅटफॉर्मने भारताे ‘आत्मनिर्भर भारत’ला प्रोत्साहन देण्याचे धाडसी पाऊल उचलल्यानंतर प्लॅटफॉर्मने सर्व विक्रम मोडत १२ दशलक्ष डाउनलोड्स केवळ ५ दिवसात अनुभवले. फ्री लाइफस्टाइल अॅप्समध्ये #१ ट्रेंडिंग असलेल्या या प्लॅटफॉर्मन एकाच दिवसात ५ लाखांपेक्षा जास्त अपलोड्स आणि २ लाख २० हजारांपेक्षा जास्त नवे कंटेंट क्रिएटर्स मिळवले.


२. खबरी: दहा लाखाहून अधिक डाउनलोडसह खबरी हे एक पॉडकास्ट अॅप्लिकेशन आहे, जे भारतभरातील हिंदी भाषिक बाजारातील निर्मात्यांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर आधपासून ४०,००० इन्फ्लुएंसर्स आहेत. कंपनीने मागील दोन दिवसात ५०००न व्या इन्फ्लुएंसर्जची नोंदणी केली. “ इन्फ्लूएंसर्स खबरी स्टुडिओ अॅपद्वारे ‘अर्न विथ खबरी’ कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. आपले चॅनल बनवू शकतात. त्यावर ते आपला कंटेंट तयार करून खबरी अॅपवर प्रकाशित करू शकतात. नियमित मासिक उत्पन्नाच्या आधारे कंटेंटचा वापर करण्याव्यतिरिक्त जीग्सच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून कमाई करण्याची संधी यावर मिळू शकते.”


३. ऐस्मा: ऐस्मा हा हायपर लोकल सोशल प्लॅटफॉर्म असून तो इन्फ्लुएंसर्सना त्यांची पद्धत व आकाराने ब्रँडचा कंटेंट तयार करण्याची संधी देते. त्यांना फॉलो करणा-या प्रेक्षकांपर्यंत त्याचे मार्केटिंग होते. व्हिडिओ, फोटो, मते, बक्षीस इत्यादी प्रकारच्या ३६० स्वरुपात ही सामग्री तयार करता येऊ शकते.


४. रूटर: क्रीडा क्षेत्रात, रुटर हे अद्वितीय उत्पादन आहे. चाहते आणि समुदाय आधारीत कंटेंटमध्ये त्यांनी व्यवसायासाठी मजबूत समन्वय तयार केला आहे. हा स्पोर्ट्स आणि गेमिंगमध्ये भारतातील एकमेव आणि सर्वात मोठा यूझर निर्मित कंटेंट प्लॅटफॉर्म आहे. रूटरची लाइव्ह कंटेंट टेक्नोलॉजीतील अद्वितीय उत्पादन स्थिती स्पोर्ट्स कॉमेंट्री, लाइव्ह क्विझ, मोबाइल गेम स्ट्रीमिंग इत्यादी साधने उपलब्ध करून देते. रुटरवर वैयक्तिक व्हिडिओज, इमेजेस, पोल्स इत्यादी वैयक्तिक स्पोर्ट्स फीड टाकता येऊ शकते. तसेच क्रिकेट, फुटबॉल आणि इतर विविध क्रीडा प्रकारांसाठी १० भारतीय भाषांमध्ये स्कोअरकार्ड उपलब्ध आहे. चिनी अॅपवर बंदी आल्यानंतर रुटरने ८ पटींनी वृद्धी अनुभवली.


५. शेअरचॅट: सोशल मिडिया स्टार्टअप शेअरचॅट हा १५ भारतीय भाषांमध्ये दररोज व्हॉट्सअप मॅसेज, स्टेटस शेअर करण्यासाठीचा भारतीय पर्याय आहे. शेअरिंग प्लॅटफॉर्मच्या रुपात सुरू झालेल्या या अॅपवर पोस्टर्स, इमेजेस, ऑडिओ, जीआयएफ आणि हॅशटॅग शेअर करण्याकरिता यूझर्सना सक्षम बनवले जाते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1