Top Post Ad

धारावीत कोरोना आटोक्यात...W H O कडून कौतूक

धारावीत कोरोना आटोक्यात...W H O कडून कौतूकधारावी


 आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून गणल्या जाणाऱ्या धारावीसारख्या परिसरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत होता. झोपडपट्टी परिसर असल्याने प्रशासनाला नियंत्रण आणणे शक्य नाही अशा चर्चा सर्वत होत होती. सुरूवातीची संख्या पाहता धारावीचा वुहान होणार असे भकीतही काहीजणांनी वर्तवले होते. मात्र ठामपा प्रशासन आणि राज्यसरकारने दिलेले विशेष लक्ष यामुळे धारावी सारख्या परिसरातील रुग्णसंख्या आटोक्यत ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे.  तब्बल २.५ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या भागात जवळपास ६.५ लाख लोकं वास्तव्य करत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने येथील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणल्याने सर्वत्र कौतूक होत आहे. 


या ठिकाणी आयसोलेशनची व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या लोकांसाठी आयसोलेशनची व्यवस्था केली. तसंच सामूहिक शौचालयाची समस्याही दूर करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाचण्याही वाढवण्यात आल्या. त्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे धारावीकर सांगत आहेत. धारावी मॉडेलची जागतिक आरोग्य संघटनेनंही दखल घेतली असून त्यांच्याकडून धारावी मॉडेलची स्तुती करण्यात आली आहे.


जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी “केवळ राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक ऐक्यातून या साथीला प्रतिबंध केला जाऊ शकतो,” असं टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस म्हणाले. “जगात अशी अनेक उदाहरणे आहेत की महामारी अत्यंत गंभीर अवस्थेत असली तरीही ती पुन्हा नियंत्रित केली जाऊ शकते. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि धारावी (मुंबई) जो जास्त लोकसंख्या असलेला भाग आहे ही याची काही उदाहरणं आहेत. सर्वांना सामील करणं, चाचणी करणे, रुग्णांचा शोध घेणं, त्यांचं अलगिकरण करणं हे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि करोनावर विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं. “मुंबईतील धारावी परिसरात करोना चाचणी, रुग्णांचा शोध घेणं, सोशल डिस्टन्सिंग आणि संसर्ग झालेल्या रुग्णांवर त्वरित उपचार केल्यामुळे करोनाविरोधातील लढाईत यश मिळताना दिसत आहे. काही देशांमध्ये आता निर्बंध कमी करण्यात येत आहेत. अशा ठिकाणी पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आम्हाला नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता आवश्यक आहे,” असं गेब्रेयेसुस यांनी स्पष्ट केलं.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com