कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फी मध्ये कपात करण्याची मागणी
मुंबई
खाजगी विनाअनुदानित शाळा तसेच ख्रिश्चन मिशनरीजच्या शाळेमधे कोरोणाच्या पार्श्वभूमीवर फी ची कपात करूण अर्धी फी म्हणजेच फर्स्ट टमची फी न घेण्याचे आदेश शाळेना देण्याबाबत रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने मुंबई अध्यक्ष आशिष गाडे आणि सर्व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने २९ जुलै रोजी निवेदन देण्यात आले.
उपरोक्त विषयाकीत्त महाराष्ट्र राज्यात कोरोणा रोगाने थैमान घातले असून ते आटोक्यात यावे म्हणून मार्च महिन्या पासून लाँकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे अनेकांची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे लोक जगण्याकरीता तारेवरची कसरत करत रोज मरमरचे जीवन जगत आहे अशात शाळा कॉलेज ही विद्यार्थीकरीता बंद आहेत तरीही शाळेचा फी मागण्याचा तगादा कायम आहे. फी भरा फी भरा म्हणून SMS, email phone व्दारे पालकांकडे फीची मागणी करण्यात येते आहे. विद्यार्थी जर फर्स्ट टम मधे शाळेला जाणार नसेल तर आम्ही पुर्ण फी का भरावी फी अर्धी म्हणजेच फर्स्ट टमची घेऊ नये लाँकडाऊनमुळे आर्थिक बाजू कमकुवत झालेल्या सर्व पालकांची मागणी रास्त आसून शासनाने ती विचारात घेतली पाहिजे त्याचबरोबर आरटीई मधून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थींना बुट गणवेश पुस्तके विकत घेण्याची सक्ती शाळेकडून केली जात आहे ते मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री यांना रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांनी दिले आहे.
0 टिप्पण्या