हे काय गौडबंगाल आहे ?
अमिताभचा संशयित आजार, की नानावटीची वारेमाप जाहिरात
आता पर्यंत किती लोकांना कोरोना झाला ? त्या बद्दल मीडियाने कोणाचेच रिपोर्ट, नाव वगैरे जाहीर केले नाहीत किंवा कोणालाच माहिती पडू दिले नाही, पण मागच्या आठवड्यात काही पेशंट ने live येवून वा व्हिडिओ व्हायरल करून नानावटी रुग्णालयातील चाललेला भोंगळ कारभार उघडकीस आणला, लागलीच त्याच आठवड्यात बिगबी ला कोरोना झाला आणि त्याच्या कुटुंबातील अजुन तीन लोकांचा म्हणजेच एकूण चार लोकांचा कोविड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवण्यात आला.इथपर्यंत ठीक होतं, परंतु आज बिगबी live आला आणि तो त्यांच्या तब्येतीविषयी काहीही न बोलता नानावटी हॉस्पिटल बद्दल सांगू लागला, नानावटी हॉस्पिटलची वारेमाप स्तुती करू लागला तेव्हा मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. हे नेमके काय चालले आहे ?
कालपरवा १४० नंबरने सुरवात होणारा जर एखादा कॉल आला तर तो रिसिव्ह करू नका, तुमचे बँक खाते तात्काळ रिकामे होईल, अश्या वाऱ्यासारख्या पोस्ट फिरू लागल्या, नंतर पोलीस चौकशीत धक्कादायक बाब उघड झाली की ही sony live चॅनेलच्या एका आगामी मालिकेची जाहिरात होती.तशीच शंका आताही येऊ लागली आहे. कोरोना तपासणीच्या प्रकरणी नानावटी हॉस्पिटल बद्दल बऱ्याच तक्रारी येऊ लागल्यानंतर, तश्या स्वरूपाचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर अमिताभला कोरोना होतोय काय, तो कोरोना इलाज करण्यासाठी नानावटी मध्ये दाखल होतो काय, तिथूनच तो ह्याविषयी ट्विट करून माहिती देतो काय आणि आज त्याच हॉस्पिटलमधून त्याचा व्हिडीओ बाहेर येतो काय आणि त्या व्हिडिओमध्ये स्वतःच्या आजारपणाबद्दल न बोलता तो त्या हॉस्पिटलचे गुणगान गातो काय.ह्या सगळ्याच गोष्टी शंकास्पद आहेत.(एखादा सेलिब्रिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल तर त्याचे मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करण्याची एक पद्धत आहे ,पण नानावटी हॉस्पिटलने सांगितले की, आम्ही अमिताभच्या प्रकृतीबद्दल काहीही सांगणार नसून,स्वतः अमिताभ ते सांगत राहतील......हा काय प्रकार आहे ? पाणी कुठेतरी मुरतंय ,एव्हढं मात्र नक्की.) एकत्यातल्या त्यात अमिताभच्या आधी रेखा ह्या अभिनेत्रींच्या बंगल्यावरील सुरक्षारक्षकाला कोरोना झाला म्हणून रेखाचा बंगला सील करण्यात येतो,पण इथे अमिताभला आणि त्याच्या घरातील अन्य तीन व्यक्तींना कोरोना ची लागण होऊनसुद्धा त्याच्या बंगल्याला मात्र सील करण्यात येत नाही , हे काय गौडबंगाल आहे ? हे नेमके काय षडयंत्र आहे ?
नानावटीची ही जाहिरात तर आहेस आहे,पण त्याचबरोबर आतंकवादी विकास दुबे याच्या संशयित फेक एन्काऊंटरवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा तर हा नीच प्रकार तर नाही ना ? कारण अमिताभ हा व्यवहारी माणूस आहे,त्याला देशाशी काहीही घेणेदेणे नाही. हा माणूस नेहमी कोणत्यापण फडतूस गोष्टींवर ट्विट करीत असतो,पण ह्या माणसाने वाढत्या पेट्रोल-डिझेल-गॅस सिलेंडरच्या दरवाढीबद्दल कधीच ट्विट केलं नाही,की कधी बोललाही नाही.(ह्याच माणसाला २०१२/२०१३ मध्ये पेट्रोलची पाच-दहा पैश्याने जरी दरवाढ केली तरी ते महाग वाटायचं,पण आता मात्र हा माणूस मूग गिळून गप्प आहे.)
याबाबत अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता खालील माहिती मिळाली
अमिताभ बच्चन धावला नानावटीच्या मदतीला
◆ नानावटी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर काही रुग्णावर उपचार केले गेले असतांना 10 पैकी 7 रुग्णांनी हॉस्पिटलने प्रचंड बिलाची आकारणी केली होती म्हणून तक्रार केली असता हॉस्पिटलची प्रतिमा (Image) खराब झाली होती व सर्वदूर हॉस्पिटल व त्यांच्या डॉक्टरवर मीडिया, वृत्तपत्र व जनमानसात एकूणच रोषाचे वातावरण झाले होते, हे वाचकांना चांगले माहिती असेल.
◆ अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन हे दोघेही सध्या नानावटी हॉस्पिटलमध्ये कोरोना झाल्यामुळे ऍडमिट असून उपचार घेत आहेत। खरे तर त्यांना कोरोनाची फारसी लक्षणे नसून (Asymptomatic) ते एकदम फाईन (Fine) आहेत.
◆ त्यांच्याकडे जुहू येथे तीन बंगले असून एकूण 18 रूम्स आहेत आणि त्या रूम्स मिनी आय सी यु (ICU) असून त्यांचे 24 तास काळजी घेणारे फर्स्ट क्लास 2 पगारी डॉक्टर्स आहेत, असे असतांना दोघेही पिता-पुत्रांनी होम क्वारांटाइन (Home Quarantine) होऊन कोरोनाची खास लक्षणे नसतांना आपल्या बंगल्यावरच इलाज करायला काही हरकत नव्हती.
◆ पण ते दोघेही नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती (ऍडमिट) झालेत एव्हढेच नाही तर बिग बी (अमिताभ) ट्विट्स (tweets) करून आपल्या खास शब्दात हॉस्पिटलची तारीफ करून आभार सुद्धा मानीत आहे.
◆ आता मेख अशी की, ज्या रेडिअंट ग्रुप (Radiant Group) च्या मालकीचे नानावटी हॉस्पिटल आहे त्यात स्वतः अमिताभ बच्चन भागीदार असून सन्माननीय बोर्ड मेम्बर सुद्धा आहे. (मालकानेच मालकाचे आभार मानणे !)
◆ यावरून आपल्या लक्षात आले असेलच की, पहिल्या पॅरिग्राफमध्ये जो मुद्धा आहे त्यावर सुंदर स्क्रिप्ट लिहून आपल्या बेहतरीन अदाकारीने अमिताभने आपल्या हॉस्पिटलची खराब झालेली प्रतिमा सावरण्याचा एक हिट शो केला असे म्हणावयास हरकत नाही.
वास्तव काही असो.... पण सोशल मिडीयावर हे मॅसेज फिरू लागल्याने लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे एवढे मात्र निश्चित.... -- मनोहर शांताराम खंदारे / नवी मुंबई
0 टिप्पण्या