Top Post Ad

प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडखळ येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडखळ येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


उरण 


सर्वोदय हॉस्पिटल घाटकोपर येथील समर्पण ब्लड बँक च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले  पालवी सामाजिक संस्था, भेंडखळ,  विजय विकास सामाजिक संस्था, नवघर जरिमरी  नवरात्र उत्सव मंडळ, भेंडखळ आणि नवतरुण मित्र मंडळ, पाणजे यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडखळ येथे आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  उरण चे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी रक्तदात्यांना विजय विकास सामाजिक संस्थेच्या वतीने थर्मास चे वाटप करण्यात आले.


थॅलेसेमिया पेशंट करता आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरास समर्पण ब्लड बँकेच्या डॉक्टर पल्लवी जाधव, शिला वाघमारे राजेश कावळे, स्नेहल कांबळे या डॉक्टरांनी तर लक्ष्मण नाईक, कुणाल शेडेकर, नितीन जाधव, प्रकाश नवले आदींनी सहभाग घेतला.  याप्रसंगी रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोइर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, भेंडखळ ग्रामपंचायत उपसरपंच लक्ष्मण ठाकूर,कृष्णा ठाकूर, रतन ठाकुर, सदस्या संध्या ठाकूर,नीलम भोईर, सोनाली ठाकूर, सुचिता ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते .


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  विजय भोईर,चंद्रविलास घरत,किरण पाटील, सतीश घरत, विकास भोईर, शैलेंद्र ठाकुर, किरण घरत, राकेश भोईर, जन्मेंजय भोईर,कौशिक भोईर, संकेत ठाकुर,मिलिंद पाटील, समिर भोईर, शरद म्हात्रे, संजय ठाकुर, लिलेश्वर ठाकुर, दीपक भोईर,  सागर कडु,हेमंत पाटील,दर्शन पाटील, दिपेश पाटील, विक्रम पाटील, लंकेश ठाकुर, प्रांजल भोईर, विवेक म्हात्रे, आदित्य घरत, निर्मला म्हात्रे, पुष्पांजली घरत, प्रगती घरत, राजश्री घरत आदी सदस्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल ठाकुर यांनी केले.  कार्यक्रमासाठी भेंडखळ ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com