मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), मुंबई मध्ये 17 हजार पदांची भरती
मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी राज्यातील पायाभूत प्रकल्प सुरू राहण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), मुंबई मध्ये सुमारे 17 हजार गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्सींग करणारे), फिटर (बार बेंडिंग व फिक्सिंग करणारे), वेल्डर, इलेक्ट्रिशियन व वायरमन अशा शैक्षणिक पात्रतेच्या कुशल आणि अकुशल कामगार (श्रमिक) मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), मुंबई येथील कुशल/अकुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व मुंबई उपनगर या कार्यालयांनी कुशल/अकुशल उमेदवारांसाठी अनुक्रमे 6 ते 8 जुलै, 2020 व 08 ते 12 जुलै 2020 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत कौशल्य विकास व उद्योजकता या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या ऑनलाइन मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई- यांच्याकडील गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्सींग करणारे), फिटर (बार बेंडिंग व फिक्सिंग करणारे), वेल्डर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, आणि अकुशल कामगार (श्रमिक) या एकूण 2923 या पदांचा समावेश आहे. सदर विविध प्रकारची रिक्तपदे विभागाच्या वर नमूद वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. सदर रिक्तपदे ही मुख्यत: मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील आहेत.
0 टिप्पण्या