नववी ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात कपात

९ वी ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात कपात


नवी दिल्ली


कोरोनामुळे शैक्षणिक वर्षांतील दिवस खूप कमी झाले आहेत. ऑगस्ट महिन्यापर्यंत शाळा उघडण्याची शक्यता नाही. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन क्लास सुद्धा सुरू केल्या आहेत. अशात विद्यार्थी आणि शिक्षकांसह पालक सुद्धा अभ्यासक्रम कमी करण्याच्या पक्षात आहेत. CBSE बोर्डाने 9 वी ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात कपात घोषित केली आहे. मूळ संकल्पना अबाधित ठेवण्यासाठी जवळपास 30 टक्के भाग कमी करण्यात आला आहे. या कपातीने धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद अशा स्वरुपाचा भाग शैक्षणिक वर्षातून पूर्णपणे काढण्यात आला आहे. NCERT आणि CBSE बोर्डाच्या तज्ज्ञांच्या एका समितीने अभ्यासक्रम कपातीचा एक आराखडा तयार केला. त्यानंतर 9 वी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर यापेक्षा खालच्या अर्थात 8 वी आणि त्यापेक्षा कमी वर्गांचा अभ्यासक्रम आराखडा शाळांनी तयार करावा असे सांगण्यात आले आहे. 


बोर्डाच्या या अभ्यासक्रम कपातीने 11 वीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातून भारताची संघराज्य पद्धती, राज्य सरकार, नागरिकत्व, राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षता असे अभ्यास वगळण्यात आले आहेत.  तर 12 वीच्या विद्यार्थ्यांना आता भारतीय अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरुप, निती आयोग, जीएसटी असे विषय शिकवले जाणार नाहीत. यासोबतच संरक्षण, पर्यावरण, नैसर्गिक साधन संपत्तीशी संबंधित युनिट्स सुद्धा काढण्यात आले आहेत. भारताचे शेजारील राष्ट्र पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका आणि म्यानमार यांच्याशी संबंधित धडे सुद्धा हटवण्यात आले आहेत. अभ्यासक्रमातील ही कपात एका शैक्षणिक वर्षापुरती मर्यादित राहील. सोबतच, अभ्यासक्रम कपातीचा फायदा 9 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळेल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती जारी केली आहे.


 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1