Trending

6/recent/ticker-posts

अग्रीमा जोशुआला तात्काळ अटक करण्याची सरनाईक यांची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या
कॉमेडियन अग्रीमा जोशुआला ताबडतोप अटक करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी


ठाणेछत्रपती शिवाजी महाराज हें महाराष्ट्राचे आराध्य दैवतं आहेत. कोणी कुठली फालतु कॉमेडियन अग्रीमा जोशुआ येते आणि  महाराजांचा अवमान करते. इतकी यांची हिंमत होतेच कशी ? अश्या लोकांमुळे कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महाराजांचा अवमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. त्यामुळे आपण ताबडतोप अग्रीमा जोशुआ नावाच्या विकृत बुद्धीच्याया कॉमेडियनला अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी आणि तिचा शो ताबडतोप बंद पाडावा.


शिवसेनेच्या महिला आघाडी व युवती सेनेच्या कार्यकर्त्यांनी अग्रीमा जोशुआ मिळेल तिथे तिचे थोबाड फोडणार असा संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे लोकभावनेचा आदर करत गृहमंत्री अनिलजी देशमुख यांना या विषयांची अत्यंत गंभीर दखल घेऊन असल्या विकृत बुद्धीच्या लोकांवर कडक कारवाई करावी. छत्रपती शिवाजी महाराजांवर विनोद करून कोणी स्वतःचे दुकान चालवायचा प्रयत्न करत असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध आहे. जे लोकं कलेच्या नावाखाली  महाराजांचा अवमान करत असतील असें कलाकार हें कलाकार नसुन समाजकंठक आहेत.


 


 


Post a Comment

0 Comments