कल्याण व कळवा येथील आदिवासी समूहाला मदतीचा हात
कल्याण व कळवा येथील आदिवासी समूहाला मदतीचा हात

 

ठाणे

 

कोरोना महामारीच्या संकट काळात कल्याण तालुक्यातील दुर्गम भागातील आपटी या गावातील आदिवासी वाडीत तसेच कळव्यातील खारेगाव आदिवासी वाडी मध्ये रयत हक्क लढा संघटना (समाज रचना संघ) यांच्या तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.    आपटी गाव (बाऱ्हॆ व चोण), ता. कल्याण,  येथे आता पर्यंत बाहेरील मदत न  पोहचलेल्या ६० घरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे व अर्सनिक अल्बम  गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 

 

सदर जीवनावश्यक वस्तू या ओएनजीसी या कंपनीच्या सीएसआर फंडातून  व मा. व्ही. टी. वानखेडे. AISCSTEWA चे रिजनल व्हाईस प्रेसिडेंट, सेंट्रल वर्किंग कमिटी, AISCSTEWA (मुंबई) संघटनेचे अध्यक्ष मा. जागेश सोमकुवर, व मा. यु. व्ही. गायकवाड. AISCSTEWA (मुंबई) चे एक्झिक्यूटिव्ह मेंबर  यांनी प्रत्यक्ष हजर राहून आदिवासींचे प्रबोधन करून व सामाजिक जाणीव  करून देऊन गरजू आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच मा. राजू रणदिवे यांच्या कडून मदत म्हणून मिळालेल्या आर्सेनिक अल्बम या गोळ्यांच्या साठ डब्या सुद्धा वाटण्यात आल्या. 

 

ह्या वाटपाच्या नियोजनात स्थानिक कार्यकर्ते माजी सरपंच चन्दर जाधव, मारवत जाधव, वैजंता जाधव, अनिता वाघे, साहिल वाघे, माई वाघे, नवनाथ वाघे, नितीन जाधव, विनोद जाधव... आणि इतर  आपटीच्या स्थानिक आदिवासी कार्यकर्त्यांनी पावसाची तमा न बाळगता खूप परिश्रम घेतले.  या अत्यंत  महत्वाचा व  गरजेचा संपूर्ण नियोजनबध्द कार्यक्रम (समाज रचना संघ) रयत हक्क लढा  संघटनेचे कार्यकर्ते  शरद लोखंडे, आरती लोखंडे व नरेश जाधव यांनी प्रत्यक्ष सहभाग घेवून पार पडला तर  कार्यकर्ते विश्वजित मिठबावकर, सखाराम जाधव व दिगंबर गायकवाड यांची उत्तम साथ लाभली.

 

तसेच रयत हक्क लढा संघटना (समाज रचना संघ) व बी.ए. आर.सी. (मुंबई) ग्रुप च्या वतीने कळवा येथील खारेगाव मधील आदिवासी वाडीतील नागरिकांना देखील जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. ह्या समाजोपयोगी कार्यात कार्यकर्ते ज्योती गायकवाड, करिष्मा पाटील व जयेश पाटील ह्यांनी सुरक्षित शारीरिक अंतरे ठेवून, मास्क लावून सर्व नियम पाळून गरजू  नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे  किट वाटप करण्यात आले. 

  

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad