शेवटी नागरिकांचे दबावामुळे ठाणे महापालिका आयुक्त यांनी
१५ दिवसात मुख्य स्मशानभूमीत उंच चिमणी बसवण्याचे दिले आदेश !
ठाणे
गेले चार महीने ठाणे येथील जवाहर बाग जवळील मुख्य स्मशानभूमीत प्रेत जाळतांना निघणारे धूर आणि दुर्गंधी मुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकरणी युवक कॉंग्रेस चे विभाग अध्यक्ष प्रविण खैरालिया, बाल्मिकी विकास संघ, कल्पतरू मित्र मंडळ, डॉ आंबेडकर गृहनिर्माण सोसायटी, इम्पिरियल हाईट सोसायटी यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच सातत्याने याचा पाठपुरावा करीत होत्या. अखेर आज अचानक महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी स्मशानभूमीत पहाणी दौरा केला. येत्या १५ दिवसांत ही समस्या दूर होईल असे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. येत्या १५ दिवसात खारटण रोड परिसरातील नागरिकांना या धूर आणि दुर्गंधी पासून सुटका मिळाली तर ठाण्यातील पर्यावरणवादी तसेच परिसरातील नागरिक आयुक्तांना धन्यवाद देतील अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली..
काही राजकारणी व तात्कालिन आयुक्त यानी अर्धवट कामाचे उदघाटन करण्याची घाई केल्यामुळेच छोट्या चिमण्या बसवून लोकांचे जीव धोक्यात घालणारी व शहरातील पर्यावरण दूषित करणारी बेकायदेशीर कृतीचा हा परिणाम असल्याचा आरोप जाग संघटनेचे संयोजक व सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी केला आहे. खैरालिया यांच्या नेतृत्वाखाली खारटण रोड परिसरातील विविध संस्था संघटनांचे कार्यकर्त्यांनी लोकांशी संपर्क करून सुमारे पाचशे नागरिकांनी केलेल्या सह्यांचे तक्रार निवेदन देवून परिसरातील नागरिकांचे आरोग्य रक्षणासाठी व पर्यावरण रक्षणासाठी तातडीने उचित कारवाई करण्याची मागणी केली केली होती. या बाबतीत जागचे संयोजक व सामाजिक कार्यकर्ता जगदीश खैरालिया यांच्यासह ज्येष्ठ माहित अधिकार कार्यकर्ते राजीव दत्ता यानी सतत पाठपुरावा करीत आहेत. c
स्मशानभूमीचे नूतनीकरण करतानाच छोट्या चिमणी का बसवण्यात आल्या? पर्यावरण नियंत्रण विभागाची मंजुरी घेतली का? ठाणे महापालिका प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकारी यानी या प्रकरणी दखल का घेतली नाही? असे प्रश्न उपस्थित करून या बाबतीत चौकशी करावी अशी मागणी आम्ही ठाणे महानगरपालिका आयुक्त व महापौर तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान याना पत्र लिहून केली आहे. तसेच पर्यावरणमंत्री श्री आदित्य ठाकरे यांना देखील पत्र पाठवून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी ही मागणी केली आहे.
महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या कडून दुर्लक्ष होत असल्याने शेवटी नागरिकांना घेवून आंदोलनाची भूमिका घेतली असल्याने महिनाभर पूर्वी एक चिमणी आणून ठेवताना वीडियो व फोटो काढून एका नगरसेवकांने काम सुरू झाले असल्याचे भ्रम लोकांमध्ये पसरवले. शहर विकासक विभागाचे एक अधिकारी श्री नेर यांनी सांगितले की, लगेचच काम करीत आहोत. त्यामुळे आम्हांला वाटले की, चला स्मशानभूमीतील धूर व दुर्गंधी मुळे लोकाना होणारा त्रास आता कायमचाच दूर होईल! परंतू अजून ही नेर सांगतात की फ़ाईल आयुक्त साहेब यांच्या कार्यालयात मंजुरीसाठी पडून आहे. शहर विकास विभागातील कामकाज आणि पर्यावरण रक्षणासाठी नेमलेल्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांचे कडून प्रदूषण रोखण्यासाठी पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचीच आतापर्यंत भूमिका राहिली आहे.
आयुक्तांनी डॉ. विपिन शर्मा यांनी जवाहरबाग स्मशानभूमीची पाहणी केली. यावेळी उपमहापौर सौ. पल्लवी पवन कदम, स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, नगरसेविका सौ. नम्रता कोळी, उप आयुक्त संदीप माळवी, सहाय्यक संचालक, नगर विकास विभाग श्रीकांत देशमुख, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, क्रीडा अधिकारी सौ. मीनल पालांडे, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे आदी उपस्थित होते. जवाहरबाग स्मशानभूमीमध्ये सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेली चिमणी बदलून त्याठिकाणी १०० फुट उंचीची चिमणी बसविण्यात येणार असून त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. कोणत्याही परिस्थितीत २० ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी आदेशित केले.
यावेळी आयुक्तांनी स्टेडियम येथील महर्षी वाल्मिकी दवाखान्यातील डॉ.अदिती कदम, त्यांच्या सर्व परिचारिका व कर्मचारी यांचे कौतूक केले. कोरोना झालेल्या रुग्णांना आयसोलेशन करणे, दवाखान्यात ऍडमिड करणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, घरी असलेल्या रुगण्याना घरी जाऊन औषध उपचार करणे, प्रत्येक रुग्ण व नातेवाईकान फोन करून माहिती व धीर देणे असे उत्तम कामाची दखल आयुक्तांनी घेतली. प्रत्यक्ष दवाखान्यात भेट देऊन त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचे मनोबल उंचवण्याचा प्रयत्न केला;
0 टिप्पण्या