Top Post Ad

रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही, जबाबदार कोण - राष्ट्रवादी

ठाण्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही याची जबाबदारी कोण घेणार - राष्ट्रवादी


ठाणे 


कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कोविड 19 ची तपासणी करण्यासाठी ठाणे पालिकेने स्वतंत्र अशी कोणतीही यंत्रणा राबविल्याचे दिसून येत नाही. आपणाकडे काही खासगी प्रयोगशाळांना तपासणीसाठी परवानगी देण्यात आली. पण, सुरुवातीला 4 हजार 500 आणि आता 2200 ते 2800 रुपये आकारुन चाचण्या केल्या जात आहेत. ठाणे पालिकेने केवळ एकाच ठिकाणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्येच अशी तपासणी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यावरही कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्याने चक्क मृतदेहाच्या शेजारीच कोविड टेस्ट करण्यात येत असल्याचे उघडकीस आले होते. (त्याबाबत आपण कोणतेही आदेश दिलेले नव्हते.) वास्तविक पाहता, ठाणे पालिकेने आपल्या अनेक आरोग्य केंद्रांमध्ये तपासणी यंत्रणा विकसीत करणे गरजेचे होते. ते अद्यापही झालेले नाही. परिणामी, ठाण्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही. याची जबाबदारी कोण घेणार आहे?  असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर (जिल्हा) सरचिटणीस संदिप जाधव यांनी उपस्थित केला आहे. 


 कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रत्येक भागात स्क्रिनिंग करुन रुग्ण शोधणे गरजेचे होते. त्यानुसार ऑक्सिमीटर घेऊन किती गल्लीबोळांमध्ये पालिकेची यंत्रणा फिरली? शहरातील एन्ट्री आणि एक्झीट पाँईटवर ही तपासणी करण्यात आली. पण, प्रत्यक्ष जिथे तपासणीची आवश्यकता होती; तिथे ही तपासणी झाल्याची प्रत्यक्ष माहिती घेतली आहे का की प्रशासनाने दिलेल्या माहितीवरच समाधानी आहात? जर वेळीच वेगवान पद्धतीने थर्मल स्क्रिनिंग झाले असते तर आजची वाढलेली रुग्णसंख्या आटोक्यात आणणे शक्य झाले असते असे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे. 


पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने विशेष कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले. मात्र या रुग्णालयातील व्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजले आहेत. हे सबंध ठाण्याने पाहिलेले आहे. याच रुग्णालयातील मृतदेहांच्या आदलाबदलीमुळे सबंध ठाणे पालिका प्रशासनाची बदनामी झालेली आहे. असे असताना महापौर म्हणून कारवाईचे आदेश दिले आहेत का, (केवळ पत्र देऊन आपण जबाबदारी नाकारत आहात का? या रुग्णालयामध्ये पुरेसा स्टाफ नाही. कर्मचारी नियुक्त करण्याआधीच रुग्णालय सुरु करण्याची घाई केली; पण, उद्घाटनानंतर कितीवेळा या रुग्णालयाला भेट दिली आहे?  कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर ठाणे पालिकेने औषध खरेदी करुन ठेवणे गरजेचे होते. ती खरेदी ठाणे पालिकेने केलेली नाही. आज ठाण्यात मोठ्या प्रमाणात रेडीसेमिर आणि अ‍ॅक्टीमेरा इंजेक्शनचा तुडवडा आहे. हा साठा पालिकेने आधीच का करुन ठेवला नाही. त्यासाठी वैयक्तीकरित्या पुढाकार घेतला नाही. असा प्रश्नही जाधव यांनी विचारला आहे. 


आज ठाणे शहर आणि राज्याचा विचार केल्यास ठाण्यातील मृत्यूदर सर्वाधिक आहे. हा मृत्युदर का वाढीस लागला आहे, याचे उत्तर कधी शोधले आहे का.? हा मृत्युदर वाढीस लागल्यामागे जे घटक कारणीभूत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश (की विनंती) पालिका आयुक्तांना केली आहे का?  महापौर म्हणून पालिका प्रशासनाला आदेश देणे गरजेचे असते. मात्र, केवळ विनंती देण्याचे काम करीत आहात. महापौर म्हणून अधिकारांचा कितीवेळा वापर केला आहे, हे ठाणेकरांना जाहीरपणे सांगा असे आवाहनही संदीप जाधव यांनी शेवटी केले आहे. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com