Top Post Ad

कळव्यातील नागरिकांचे कोरोना संकटात पाण्यावाचून प्रचंड हाल 

पाण्याचा ठेकाच संपल्याने व्हॉल्व ऑपरेटर, सुल्समन यांचा पगार थांबला,


कळवेकारांचे कोरोना संकटात पाण्यापासून प्रचंड हाल 




ठाणे : 


एकीकडे कोरोनाचा मार, दुसरीकडे विेजेचा लपंडाव तर त्यात आणखीन भर पाणी टंचाई अशा तिहेरी संकटात कळव्यातील नागरीक अडकले आहेत.  पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मात्र लॉकडाऊनमुळे घरातच थांबावे लागत आहे. आधीच आर्थिक टंचाईने ग्रस्त झालेल्या नागरिकांना या संकटातून कोणी लोकप्रतिनिधी सोडवेल की नाही असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. केवळ मतं मागण्यासाठी दारोदारी फिरणारे खासदार आमदार नगरसेवक आता कुठे गायब झालेत असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.  पाण्याचा ठेका संपल्याने मागील पाच महिने बिना वेतन कळवा परिसरातील व्हॉल्व्हमन, सुल्समन काम करत आहेत. या कामगारांचा उदरनिर्वाह चा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. टोरंट कपंनीचा विद्युत पुरवठा कळवा परिसरात सुरू झाल्यापासून लाईटचा मोठा लपंडाव या परिसरात सुरू आहे. दिवस असो किंवा रात्र कुठलीही पूर्व सूचना न देता डायरेक्ट लाईट जात असल्याने नागरिकांना विद्युत समस्येला सामोरे जावे लागत आहे.


ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पाणी पुरवठा करण्याकरिता व्हॉल्वमन आणि सुल्समन पुरवण्याकरिता निविदा काढण्यात येते. त्या निविधांचा ठेका मार्च 2020 महिन्यात संपला पण अद्यापही नवीन ठेका काढण्यात आला नसल्याने मार्च ते जुलै पर्यंतचा व्हॉल्व मन , सुल्समन यांचा पगार थांबला आहे. यामुळे काही विभागात कामगार काम करत नसल्याने नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल सुरू झाले आहे.

कळवा प्रभाग समिती अंतर्गत सुमारे 70 व्हॉल्वमन, सुल्समन ठेकेदार पद्धतीने काम करत आहेत. पाणी पुरवठा विभागाला पुरवण्यात येणारे व्हॉल्वमन आणि सुल्समन यांचा ठेका मार्च 2020 लाच संपला आहे. पण नवीन निविदा निघेल याची वाट पाहत जुलै महिना आला असून देखील 70 व्हॉल्वमन ला वेतन मिळाले नाही. यामुळे कळवा प्रभाग समिती अंतर्गत काम करणारे हे व्हॉल्वमन यांनी पाणी सोडण्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना पाणी पुरवठा कमी प्रेशरने होत आहे. तर काही विभागात पाणीच मिळत नाही. यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल सुरू झाले आहे. धरणातून पाणीपुरवठा सुरळीत सुरू असून देखील पाणी पुरवठा करणाऱ्या व्हॉल्व्हमन आणि सुल्समनची निविदा संपल्याने याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. बिना वेतन पाच महिने कोरोना संकटात काम करावे लागत आहे. काही परिसरात पाण्याचे व्हॉल्व्ह सोडण्याचे कामच बंद पडल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. यामुळे स्वच्छ राखा, आरोग्य संभाळा असे कोरोना काळात सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. पण नागरिकांना पुरेसे पाणीच मिळत नसल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. यामुळे ठामपा आयुक्तांनी यावर तात्काळ तोडगा काढून पाणीपुरवठा सुरळीत करणे गरजेचे असल्याचे नागरिक सांगत आहेत.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com