लॉकडाउन दरम्यान  मध्य रेल्वेने केली अनेक महत्वाची सुविधा कामे 

लॉकडाउन दरम्यान  मध्य रेल्वेतील अनेक पादचारी पूलांच्या (एफओबी) ठिकाणी महत्वाची पायाभूत सुविधा कामे 


मुंबई
 
 मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली तेव्हापासून, आवश्यक वस्तू अखंडितपणे मिळण्यासाठी मालवाहतूक चालविण्याशिवाय आणि संपूर्ण भारतभर निवडक विशेष प्रवासी गाड्या चालविण्याव्यतिरिक्त, मध्य रेल्वेने लॉकडाऊन कालावधीचा उपयोग करून महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा कामे पूर्ण केली आहेत.  या केलेल्या कामाच्या प्रमाणात  वाहतूक अवरोधांची अनेकदा आवश्यकता भासली असती आणि सामान्य काळात चालणार्‍या काही गाड्यांवरही त्याचा परिणाम झाला असता.  लॉकडाऊनपासून १४ पादचारी पूलांसाठी  (फूट ओव्हर ब्रिज)  स्टील गर्डर उभारण्यासाठी आणि ९ पादचारी पूलांच्या (फूट ओव्हर ब्रिज) जुन्या स्टील स्ट्रक्चर्सचे काढून  टाकण्याकरिता मध्य रेल्वेच्या २३ ठिकाणी पायाभूत सुविधांचे काम करण्यात आले. या २३ महत्त्वपूर्ण पायाभूत कामांमध्ये मुंबई विभागातील ७, भुसावळ विभागातील १०, नागपूर व सोलापूर विभागात प्रत्येकी एक, पुणे विभागातील ३ आणि निर्माण शाखेतील एक काम होते.   
 मुंबई विभाग:  -  डोंबिवली स्थानकात ६ मीटर रुंद (फूट ओव्हर ब्रिज-एफओबी) आणि बेलापूर स्थानकाजवळ ३.६६ मीटर रुंद मिडसेक्शन पादचारी पूलाच्या (एफओबी) , गर्डर उभारणीचे कार्य सुरू. 
•वडाळा रोड येथील पादचारी पूलाचे (एफओबी) २ जीर्ण पोलादी स्पॅन, अंबरनाथ येथे पादचारी पूलाचा (एफओबी) एक स्पॅन, अंबिवली येथे पादचारी पूलाचा (एफओबी) एक स्पॅन, आटगाव येथे पादचारी पूलाचे (एफओबी) २ स्पॅन काढून टाकण्यात आले. 
• वाशिंद रेल्वे स्थानकात १०० वर्षांहून अधिक जुन्या पादचारी पूलाचे (एफओबी) दोन स्पॅन तोडण्यात आले.
 
 नागपूर विभाग:  - • वर्धा स्टेशनवर १६ रेल्वे ट्रॅक ओलांडणा-या ६ मीटर रुंद  पादचारी पूलाच्या (एफओबी)  गर्डरचे ६ स्पॅन उभारण्याचे सूरू करण्यात आले. 


 भुसावळ विभाग:  - • भुसावळ स्टेशनवर जुना पादचारी पूल (एफओबी) बदलून त्याऐवजी नवीन ४.८८ मीटर रूंद पादचारी पूलाच्या (एफओबी) गर्डरची उभारणीचे कार्य सुरू.  
• भुसावळ-बडनेरा विभागातील बोदवड स्टेशनवर ३.६६  मीटर रुंदीच्या पादचारी पूलाची (एफओबी) आणि बडनेरा-नरखेड भागातील नवीन अमरावती येथे एक पादचारी पूलाच्या (एफओबी) गर्डरची उभारणी सुरू करण्यातआली. 
• अकोला स्थानकात जुन्या पादचारी पूलाच्या (एफओबी) ऐवजी ६ मीटर रुंदीच्या नवीन  पादचारी पूलाच्या (एफओबी)  गर्डरच्या उभारणीची सुरूवात. 
• चांदूरबाजार स्टेशन व बडनेरा-नरखेड विभागातील अमरावती स्थानक आणि  भुसावळ-बडनेरा विभागातील नांदुरा स्टेशनवर ३.६६ मीटर रुंदीच्या पादचारी पूलाच्या (एफओबी) उभारणीसाठी   गर्डरची सुरूवात. 
• भुसावळ, नाशिक रोड आणि शेगाव स्थानकांवर जुन्या  पादचारी पूलाचे (एफओबी) जुने नालीदार स्टील स्ट्रक्चर्स काढून टाकण्यात आले.


 सोलापूर विभाग: -  दौंड स्टेशनवर ६ मीटर रुंद  पादचारी पूलाच्या (एफओबी) गर्डरच्या उभारणीसाठी सुरूवात झाली आहे. 


  पुणे विभाग: - • कडेठाण स्टेशनवर ३.६६  मीटर रुंद पादचारी पूलाचे (एफओबी), चिंचवड स्टेशनवर ६ मीटर रुंद  पादचारी पूलाच्या (एफओबी) गर्डरच्या उभारणीसाठी सुरूवात करण्यात आली आहे. 
• तळेगाव स्थानकात पादचारी पूलाचे (एफओबी) दोन स्पॅन काढून टाकण्यात आले आहेत. 


 निर्माण विंग: -  पुणे विभागातील भवानीनगर स्टेशनवर ३ मीटर रुंदीच्या पादचारी पूलाचे (एफओबी)  बांधकाम करण्यात आले आहे.


 लॉकडाऊनमुळे मनुष्यबळाचा इष्टतम उपयोग, मर्यादित संसाधने व यंत्रसामग्रीचा प्रभावी उपयोग आणि कोविड-१९ साठी अनिवार्य निकषांचे पालन वरील कामांच्या अंमलबजावणी दरम्यान करण्यात  आले असल्याची माहीती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभाग यांचे द्वारा  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १५ जुलै रोजी   प्रप क्रमांक 2020/07/22 या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जारी करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1